• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 7, 2015

आयसिसमध्ये सहभागी व्हायला निघालेल्या नवी मुंबईतील पत्रकाराला अटक

adminbyadmin
in नवी मुंबई
0

नवी मुंबई  : आपल्या दहशतीने व क्रूर पद्धतीमुळे हत्या घडवून आणणा-या आयसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यास उत्सुक असलेल्या नवी मुंबईतील एका पत्रकाराला काल रात्री नवी दिल्ली पोलिसांनी अटक केली. जुबेर अहमद खान असे त्याचे नाव असून, तो एका उर्दू पेपरचा पत्रकार आहे. इराकला जाण्यासाठी व्हिसा मिळवण्यासाठी तो दिल्लीला गेला होता. तेथेच पोलिसांनी त्याला अटक केली.
जुबेरला आयसिसचे प्रवक्ता व्हायचे होते. यासाठी जुबेर खानने सोशल मीडियावरून आयसिसचा नेता अबू बक्र अल-बगदादीला मेसेज केला होता. जुबेरने बगदादीकडे आयसीसचा अधिकृत प्रवक्ता बनण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर त्याने नवी दिल्लीतील भारतातील इराक दूतावासाशी संपर्क साधला तसेच व्हिसाची मागणी केली. गुरुवारी तो दिल्लीतील वसंत विहारमधल्या इराकी दूतावासात झुबेर व्हिसा घ्यायला गेला. तेथे तो आयसिसबाबत माहिती विचारत होता. त्यामुळे इराकी दूतावासातील अधिकार्‍यांनी याची माहिती दिल्ली पोलिसांना तत्काळ दिली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला दूतावासातून ताब्यात घेतले.

** याच पत्रकाराने याकूबला ठरवले होते शहीद-
मार्च १९९३ मध्ये मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणात दोषी आढळलेल्या व नुकतीच फाशी देण्यात आलेल्या याकूब मेमनला झुबेर अहमद खानने त्याला ‘शहीद’ झाला असे म्हटले होते. याकूब मेमनला ३० जुलै रोजी नागपूरात फाशी देण्यात आल्यानंतर त्याला दु:ख झाले होते. फाशीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच १ ऑगस्ट रोजी झुबेर खाने सोशल मिडियात एक पोस्ट टाकून याकूबला शहीद संबोधत या फाशीचा निषेध व्यक्त केला होता.
याकूबच्या फाशीचा बदला घेण्यासाठी भारत सोडून आयसिसमध्ये जायची इच्छा त्याने त्यावेळी व्यक्त केली होती. लवकरच मी दिल्लीला जाईन आणि इराक दूतावासातून व्हिसा घेऊन इराकला जाईन असेही त्याने म्हटले होते. त्यानंतर काही नेटिझन्सनी याबाबत पोलिसांत तक्रार केली होती. तेव्हापासून झुबेर पसार झाला होता. याबाबत मुंबई पोलिसांच्या सूचनेनंतर दिल्ली पोलिसांनी इराक दूतावासाला त्याच्याबाबत विचारणा केली होती. अखेर गुरुवारी सायंकाळी तो इराकी दूतावासात जाताच अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान, आयसिसमध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर सांगणार्‍या झुबेर खानची मानसशास्त्रीय तपासणी करण्यात येणार आहे.

Previous Post

मेट्रो दरवाढीला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

Next Post

‘मातोश्री’वर शस्त्र घेऊन जाणारा संशयित ताब्यात

Next Post
‘मातोश्री’वर शस्त्र घेऊन जाणारा संशयित ताब्यात

‘मातोश्री’वर शस्त्र घेऊन जाणारा संशयित ताब्यात

नदीपात्रात युवकाची आत्महत्या, पत्नीशी भांडण झाल्याने संपविले जीवन

मौज मजेसाठी बँकेच्या एटीएममधून ५१ लाख लांबवणार्‍या चौघांना अटक

वोक्हार्ट हॉस्पिटलतर्फे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com