• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 7, 2015

जन्मदात्या आईकडूनच मुलांची हत्या

adminbyadmin
in टॉप न्यूज
0

*** ठाणे, पुण्यातील वेगवेगळ्या घटना
ठाणे – जन्मदात्या आईनेच मुलांची हत्या केल्याच्या दोन थरारक घटना ठाणे व पुण्यात उघडकीस आल्या आहेत. अमली पदार्थांच्या आहारी जाऊन पैशांसाठी मारझोड करणार्‍या मुलाचा आईने गळा घोटला, तर दुसर्‍या घटनेत वडिलांकडे जाण्याचा हट्ट करणार्‍या मुलाला घटस्फोटाच्या प्रतीक्षेत असणार्‍या आईने मारले.
ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील प्रिया चौधरी यांचा 20 वर्षीय मुलगा अशोक हा अमली पदार्थांच्या आहारी गेला होता. या व्यसनाची गरज पूर्ण करण्यासाठी तो सातत्याने आपल्या आईकडे पैशांची मागणी करायचा. बुधवारीही त्याने एक हजार रुपयांची मागणी केली होती, मात्र आईने त्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या अशोकने चक्क आईवरच हात उगारला. मुलाने अक्षरश: पट्ट्याने बेदम मारहाण केल्यामुळे प्रिया यांचाही पार चढला. दररोजच्या या कटकटीला त्या प्रचंड वैतागल्या होत्या. गुरुवारी दुपारी अशोक घरात झोपला असता प्रियाने संगणकाच्या वायरने त्याचा गळा आवळला, त्यात अशोक जागीच गतप्राण झाला. याप्रकरणी पोलिसांनी प्रियाला अटक केली आहे.

***
वडिलांकडे जाण्याचा हट्ट जिवावर बेतला
पुणे : पती-पत्नीमध्ये घटस्फोटावरून सुरू असलेल्या वादात महिलेने आपल्या 13 वर्षीय मुलाची डोक्यात बॅट घालून हत्या केल्याची घटना पुण्यातील टिंगरेनगर येथे गुरुवारी घडली. आरोपी राखी बालपांडे हिला अटक करण्यात आली आहे.
राखी वाकडेवाडीतील कंपनीत नोकरी करते, तर तिचा पती नागपूरला असतो. घटस्फोटासाठी राखीने न्यायालयात अर्ज केलेला आहे. या दांपत्याचा मुलगा चैतन्य आईसोबतच पुण्यात राहत होता. गेल्या काही दिवसांपासून चैतन्य वडिलांकडे जाण्याचा हट्ट करत होता. यामुळे चिडलेल्या राखीने चैतन्यच्या डोक्यात बॅटने प्रहार केले. घाव इतका जबरदस्त होता की त्यामुळे चैतन्यचा मृत्यू झाला. दरम्यान, डॉक्टरांच्या अहवालानुसार, चैतन्यच्या शरीरावर विविध ठिकाणी फ्रॅक्चर होऊन रक्तस्राव झाल्याचे म्हटले आहे. तसेच डोक्यात बॅट मारल्यानंतर राखीने त्याचा गळा दाबल्याचेही उघड झाले आहे.

Previous Post

आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला तर राष्ट्रवादीला ‘भ्रष्टवादी’ टोमणा

Next Post

याकूबला फाशी सुनावणार्‍या न्यायाधीशांना धमकी

Next Post
याकूबला फाशी सुनावणार्‍या न्यायाधीशांना धमकी

याकूबला फाशी सुनावणार्‍या न्यायाधीशांना धमकी

सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

एकीकडे शेतकर्‍यांना मदतीसाठी निधी नाही, दुसरीकडे आमदारांची भूक वाढतंच चाललीय

दाऊदचा उजवा हात असणार्‍या येडा याकूबचा मृत्यू

दाऊदचा उजवा हात असणार्‍या येडा याकूबचा मृत्यू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com