• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 1, 2015

पुन्हा एकदा समुद्रात झेपावण्यासाठी नौका सज्ज

adminbyadmin
in महाराष्ट्र
0

रत्नागिरी : कोकणात आजपासून मासेमारीला सुरुवात होतेय. यंदापासून मासेमारीला १ ऑगस्टपासून सुरुवात होतेय. त्यामुळे समुद्र किनार्‍यांवर मच्छिमार बांधवांची लगबग पहायला मिळतेय.
समुद्र किनार्‍यावर विसावलेल्या मच्छिमारी नौका पुन्हा एकदा समुद्रात झेपावण्यासाठी सज्ज झाल्यात. त्यासाठीच किनारपट्टीवर मच्छिमार बांधवांची अशी लगबग सुरू आहे. दोन महिन्यांच्या बंदीच्या कालावधीत नौकांची डागडूजी पूर्ण झाली असून सर्वच नौका किनार्‍यावर आणल्या गेल्यात. १ ऑगस्टपासून पुन्हा एकदा नव्या जोमानं मासेमारीला सुरुवात होईल.
खरं तर दरवर्षी राज्यात १५ ऑगस्ट किंवा नारळी पौर्णिमेपैकी जो दिवस आधी येईल त्यादिवशी मासेमारीवरची बंदी उठवली जायची. पण इतर राज्यातली बंदी १ ऑगस्टला उठवतात. त्यामुळे बाहेरचे मच्छिमार याठिकाणी येऊन व्यवसायाला सुरुवात करायचे. त्यामुळे इथल्या मच्छिमारांचं नुकसान व्हायचं. पण, यंदापासून देशभरातल्या सर्वच किनारपट्टी भागातल्या बंदी कालावधीत सुसूत्रता आणण्यासाठी प्रशासनाकडून १ जून ते ३१ जुलै असा बंदी कालावधी ठरवण्यात आलाय.
मासेप्रेमींची सुरमई, प्रॉन्झ, पापलेट, बांगडा, घोळ माशांना सर्वाधिक पसंती मिळते. या व्यवसायातून दर महिन्याला तीनशे कोटींची तर वर्षभरात चार हजार कोटींची उलाढाल होते. वादळी वारे, सततचा अवकाळी पाऊस यामुळे गेल्या हंगामात मच्छिमारी बांधवाना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं होतं. पण यंदा तरी निसर्ग साथ देईल आणि हा हंगाम चांगला जाईल, अशी अपेक्षा मच्छिमार व्यक्त करत आहेत.

Previous Post

पश्‍चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस, ३९ जणांचा मृत्यू

Next Post

जीवनधाराच्या मेळव्यांमधून १८२५ उमेदवारांना नोकर्‍या

Next Post
जीवनधाराच्या मेळव्यांमधून १८२५ उमेदवारांना नोकर्‍या

जीवनधाराच्या मेळव्यांमधून १८२५ उमेदवारांना नोकर्‍या

शिवसेना गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रतन मांडवेची निवड

शिवसेना गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रतन मांडवेची निवड

शेतकर्‍याला जबर मारहाण, पोलिसांचे निलंबन

शेतकर्‍याला जबर मारहाण, पोलिसांचे निलंबन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com