• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 22, 2015

१३ वर्षीय मुलीनं शिक्षिकेला सांगितली वडिलांच्या अत्याचाराची कहानी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
१३ वर्षीय मुलीनं शिक्षिकेला सांगितली वडिलांच्या अत्याचाराची कहानी

नवी मुंबईतल्या वाशीतील घटना
नवी मुंबई : जेव्हा शाळेतील विद्यार्थिनी आपल्या शिक्षिकेला पत्र देते तेव्हा ते सुट्टी असेल, असंच आपण गृहित धरतो. पण वाशीमध्ये एक अशी घटना घडलीय, ज्यामुळं आपल्याला धक्का बसेल.
वाशीतील एका शाळेच्या १३ वर्षीय विद्यार्थिनीनं आपल्या शिक्षिकेला पत्र लिहून तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली. या पत्रात लिहिलं होतं की, तिचे वडील तिच्यावर बलात्कार करतात आणि आई ते पाहत राहते, तिची मदत करत नाही.
घटनेनंतर शिक्षिकेनं स्थानिक एनजीओला संपर्क केला. त्यांच्या मदतीनं विद्यार्थिनीनं आपल्या आई-वडिलांविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवलीय.
सातव्या वर्गात शिकणारी १३ वर्षीय मुलीनं आपल्या शिक्षिकेला गेल्या आठवड्यात पत्र लिहिलं होतं. तिच्यावरच नाही तर तिच्या मोठ्या बहिणीवरही वडील बलात्कार करत असल्याचं लिहिलं होतं.
पोलिसांनुसार मुलीचे वडील एक फळविक्रेता आहे. मुलीनं पोलिसांसमोर सांगितलं, ’माझे वडील आईसमोर माझ्यावर बलात्कार करतात. त्यानंतर आई मला एक गोळी खायला देते. मी सात वर्षांची असतांनापासून वडील माझ्यावर बलात्कार करतात.’
आता पोलीस हे तपास करत आहेत की, ती गोळी प्रेग्नेंसी थांबविण्याची आहे का? पीडित मुलीची मोठी बहिण, मोठा भाऊ आणि दोन लहान भाऊ आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत तिच्यावर बलात्कार व्हायचा. पोलिसांच्या मते पीडित मुलीची मोठी बहिण घरी राहत नाही, पण ती सुद्धा वडिलांच्या शोषणाची बळी आहे.

***काऊंसिलिंगनंतर मिळाली हिंमत
विद्यार्थिनीनं आपल्यावरील अत्याचाराबद्दल बोलण्याचं साहस शाळेत झालेल्या काऊंसिलिंगनंतर केली. मुलीला आता एनजीओद्वारे चालवल्या जाणार्‍या बालकेंद्रात ठेवलंय. तिच्या आई-वडिलांविरोधात कलम ३७६, पोस्को ऍक्टचे सेक्शन ५ (एल) (एन)अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय.

Previous Post

आमदारांच्या हजेरीवरून सत्ताधार्‍यांसह विरोधकही चिंताग्रस्त!

Next Post

मेट्रो भाडेवाढ प्रकरणात रिलायन्स करतेय मुंबईकरांची पिळवणूक

Next Post
मेट्रो भाडेवाढ प्रकरणात रिलायन्स करतेय मुंबईकरांची पिळवणूक

मेट्रो भाडेवाढ प्रकरणात रिलायन्स करतेय मुंबईकरांची पिळवणूक

श्रीलंका दौर्‍यासाठी सर्वोत्तम वेगवान मारा – संदीप पाटील

श्रीलंका दौर्‍यासाठी सर्वोत्तम वेगवान मारा - संदीप पाटील

सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा नेरूळ सेक्टर ६ ला विठ्ठल दर्शन सोहळा

सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा नेरूळ सेक्टर ६ ला विठ्ठल दर्शन सोहळा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com