• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 15, 2015

बुधवारी विरोधकांनी पिटल्या टाळ, भजन करून आंदोलन

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
बुधवारी विरोधकांनी पिटल्या टाळ, भजन करून आंदोलन

** ज्ञानबा तुकाराम, सरकारचं काय काम – विरोधकांचं भजन
मुंबई : विरोधकांनी बुधवारी हाती टाळ घेऊन विधानभवन परिसरात भजन गात सरकारचा निषेध केला. सलग तीन दिवसांपासून विरोधक आक्रमक होत विविध प्रकारचं आंदोलन करत आहेत. पहिल्या दिवशी चिक्की घोटाळ्याची कविता. दुसर्‍या दिवशी चिक्की खाऊन आमदाराचं बेशुद्ध होणं आणि आज भजन. विरोधक चांगलेच आक्रमक दिसत आहेत.
** नदीला आला पूर, पाणी लागलं वडाला, नरेंद्र म्हणाला देवेंद्रला, आपलं सरकार बुडाला, ज्ञानबा तुकाराम, सरकारचं काय काम, असं उपरोधिक भजन विरोधकांनी विधानभवन परिसरात गायलं.
**विधानभवनात सरकारनं माध्यमांना रोखलं, विरोधकांचा आक्षेप, देशाची आणीबाणीकडे वाटचाल, अजित पवारांचं टीकास्त्र

अजित पवार काय म्हणतात-
*- विधानभवनात माध्यमांना वृतांकन करण्यापासून अटकाव करणं निषेधार्ह असून या संदर्भात विधानसभा अध्यक्षांची चर्चा करणार.
* आरबीआय ही सरकारच्या अधिपत्याखाली काम करत आहे. मनमानी कारभार सुरु.
* उद्धव ठाकरे यांनी ही कर्जमाफीची मागणी केली आहे आणि शिवसेना आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता.
* आम्ही कधी मारून मुटकून एकतर्फी कामकाज केलं नाही. महत्वाचे विधेयक आमच्याशी चर्चा न करता मंजूर करने हे चुकीचे. यासाठी दररोज सकाळी संसदीय कामकाज मंत्री सर्वपक्षिय गट नेत्यांची बैठक व्हावी.

सुनील तटकरे – विधानपरिषदेत काय म्हणतात-
* मुख्यमंत्री यांची विश्वासहर्ता पणाला लागली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी घरी जातात आणि त्यानंतर तिथं आत्महत्या होतात.
* कर्जमाफी जोपर्यंत जाहिर करत नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही

अजित पवार काय म्हणतात-
* विधिमंडळाच्या वतीने पत्रक काढून पायर्‍यांवरील आंदोलन कव्हर करण्यास पायबंद, ही माध्यमांच्या मुस्कटदाबी
* आडवाणी म्हणतात आणाबाणी येऊ शकते त्याची प्रचिती येत आहे
* विधानपरिषद कामकाज एक तासाकरता तहकूब
* याविरोधात विरोधक अध्यक्ष आणि सभापतींना भेटणार

अबू असीम, आझमी, सपा नेते काय म्हणतात –
* याकूब मेमनच्या फाशीची तारीख लीक होणं ही सरकारची मार्केटिंग
* कसाब, अफज़ल गुरुच्या फाशीची तारीख कधीच समजली नव्हती मग याकूबची फाशीची तारीख कशी काय लिक झाली.
* सरकारचा सांप्रदायिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न.
* याकूबची क्यूरेटिव पेटिशन अजूनही सुप्रीम कोर्टात विचाराधीन.
* सरकारचा जनतेच्या मूळ विषयांना बगल देण्याचा प्रयत्न

सलग तिसर्‍या दिवशीही विधानभवनाबाहेर पायर्‍यांवर बसून विरोधकांचं आंदोलन सुरूच आहे. विधीमंडळात आजही कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतलाय.
राज्यात दुष्काळाचं सावट असल्यानं सरकारनं शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून लावून धरलीय. काल अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी विरोधकांनी याविषयी सभात्याग केल्यावर विधानसभेचं कामाकाज विरोधकांशिवाय पुढे नेण्याचा सरकारनं निर्णय घेतला. आजही विरोधक आक्रमक झालेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज निती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीत असल्यानं ते मुंबईत उशीरा येणार आहेत. त्यामुळं मुख्यमंत्री नाहीत तर चर्चा कुणासोबत करणार अशी भूमिका विरोधी पक्षानं घेतलीय. विरोधकांच्या गदारोळामुळे सुरूवातीलाच १० मिनीटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं.

Previous Post

‘बाजीराव मस्तानी’चा फर्स्ट लूक प्रदर्शित

Next Post

‘बाहुबली’ची पाच दिवसांत २१५ कोटींची कमाई

Next Post
‘बाहुबली’ची पाच दिवसांत २१५ कोटींची कमाई

‘बाहुबली’ची पाच दिवसांत २१५ कोटींची कमाई

’निरुपम, हिंमत असेल तर दादरमध्ये या’

’निरुपम, हिंमत असेल तर दादरमध्ये या’

महापालिकेच्या वेबसाईटवर स्वीकृत नगरसेवकांची पदे रिक्तच!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com