• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 29, 2015

‘सालेमशी लग्न लावून द्या, नाहीतर आत्महत्या करीन’

adminbyadmin
in ठाणे
0
‘सालेमशी लग्न लावून द्या, नाहीतर आत्महत्या करीन’

ठाणे : मुंब्र्यात रहाणार्‍या २५ वर्षीय तरुणीने टाडा न्यायालयाकडे अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमसोबत विवाह करण्याची परवानगी मागितली आहे. या तरुणीने टाडा न्यायालयामध्ये सहा पानी अर्ज केला असून, न्यायालयाने अनुकूल निर्णय दिला नाही तर, जीवन संपवून घेण्याची धमकी या तरुणीने दिली आहे.
२०१४ मध्ये अबू सालेमने रेल्वे प्रवासात विवाह केल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. त्यावेळी ज्या तरुणीसोबत सालेमचे नाव जोडले गेले होते त्या तरुणीने आता सालेमसोबत रीतसर विवाह करण्यासाठी टाडा न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे.
सालेमसोबत नाव जोडले गेल्याने समाजात माझी बदनामी झाली असून, आयुष्य जगणे कठीण झाले आहे. सालेमसोबत विवाह करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही. सालेमशी विवाह झाला नाही तर, मला आत्महत्या करावी लागेल असे या तरुणीने १५ जूनला टाडा न्यायालयात केलेल्या अर्जात म्हटले आहे.
विवाहाचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी सालेमला मुंबईतील मॅरेज रजिस्ट्रारच्या कार्यालयात आणण्याची परवानगी तिने टाडा न्यायालयाकडे मागितली आहे. सालेम सध्या तळोजा तुरुंगात आहे.
वाणिज्य शाखेची पदवीधर असलेल्या या तरुणीने मुंबई पोलिसांमुळे आपल्यावर ही वेळ ओढवल्याचा आरोप केला आहे. सालेमसोबत मॉर्फ केलेल्या फोटोवरुन पोलिसांनी तिची चौकशी सुरु केली. पोलिसांनी आझमगड, गुजरात, लखनऊ येथे रहाणार्‍या आपल्या नातेवाईकांकडे जाऊन चौकशी केली. त्यामुळे माझी बदनामी होऊन माझे जगणे मुश्किल झाले आहे, असे या तरुणीने अर्जात म्हटले आहे.

Previous Post

नवी मुंबईतील भूखंडांच्या आधारभूत किंमतीत २० ते २५ टक्के वाढ

Next Post

सनी लिओनला मिळाला मोठा ब्रेक

Next Post
सनी लिओनला मिळाला मोठा ब्रेक

सनी लिओनला मिळाला मोठा ब्रेक

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – आ. नाईक

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही - आ. नाईक

पटणी मार्गाची लवकरात लवकर सुधारणा करा : आमदार संदीप नाईक

पटणी मार्गाची लवकरात लवकर सुधारणा करा : आमदार संदीप नाईक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com