• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 9, 2015

प्रेम केलं म्हणून त्या दोघांना गावकर्‍यांनी मूत्रप्राशन करण्यास भाग पाडले

adminbyadmin
in ई - पेपर्स
0
प्रेम केलं म्हणून त्या दोघांना गावकर्‍यांनी मूत्रप्राशन करण्यास भाग पाडले

भोपाळ : मध्यप्रदेशमधील एका तरूण मुलाला आणि महिलेला गावकर्‍यांनी प्रेमाची भयानक शिक्षा दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. वयामध्ये बरेच अंतर असूनही विवाहीत माहिलेच्या प्रेमात पडल्याप्रकरणी तरूण आणि त्याची विवाहीत प्रेयसी या दोघांचे टक्कल करून त्यांना चप्पलेचे हार घालून गावातून धिंड काढण्यात आली. एवढे करूनही गावकर्‍यांचा राग शांत न झाल्याने त्यांनी लोखंडाच्या गरम सळ्यांनी या दोघांच्या चेहर्‍यावर चटके दिले. तसेच या दोघांना मूत्रप्राशन करण्यास भाग पाडले.
होशंगाबाद जिल्ह्यातील मैदाखेडा गावात सोमवारी संध्याकाळी झालेले हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी चार गावकर्‍यांना अटक केली आहे. संपूर्ण गावासमोर ही जाहीर शिक्षा देण्यात आली. गावातील वयोवृद्ध लोकांनी गावात कोणीही अशाप्रकारे विवाह झाल्यानंतरही प्रेमात पडल्यास त्याला अशीच शिक्षा दिली जाईल असा इशारा दिला. गाववाल्यांनी या दोघांना आपल्या पद्धतीने शिक्षा दिल्यानंतर पोलिस स्टेशनसमोर टाकून दिले. पोलिसांनी या प्रेमी युगूलाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
शेजारील सिगोंदी गावातील अक्षय मेहरा या तरूणाचे मैदाखेडा गावातील रामगोपाल ठाकूर यांच्या पत्नीवर प्रेम जडले. रामगोपालची पत्नीही अक्षयच्या प्रेमात पडली. या प्रेमप्रकरणाबद्दल रामगोपालला कळल्यानंतर त्यांने पत्नीला अक्षयला न भेटण्याचा सल्ला दिला. मात्र रामगोपालची पत्नी पतीच्या टोमण्यांना आणि त्रासाला कंटाळून माहेरी निघून गेली. मात्र त्यानंतर ती मैदाखेडाला न येता सिगोंदी गावात अक्षयबरोबर राहू लागली.
शुक्रवारी मैदाखेडामधील गावकर्‍यांनी या दोघांना सिगोंदीमधून कायद्यानुसार तुमच्या दोघांचे लग्न लावून देऊ असे सांगून त्यांना गावात आणले. गावात आणल्यानंतर रामगोपाल ठाकूर आणि त्याच्या साथीदारांने या दोघांवर अत्याचार करून त्यांना पोलिस स्टेशनसमोर फेकून दिले. पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबामध्ये रामगोपालच्या पत्नीने आपल्याला अक्षयबरोबरच रहायचे असल्याचे सांगितले आहे. रामगोपलसहीत तीन लोकांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली आहे.

Previous Post

समर फेस्टीवलमध्ये हस्तकला उत्पादने, खाद्यपदार्थ व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

Next Post

मुंबईत 552 धोकादायक इमारतींची भर

Next Post
मुंबईत 552 धोकादायक इमारतींची भर

मुंबईत 552 धोकादायक इमारतींची भर

फोर्ब्सच्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत ‘धोनी’

फोर्ब्सच्या श्रीमंत खेळाडूंच्या यादीत ‘धोनी’

मनपाने केल्या जाहीर नवी मुंबई शहरातील 13 शाळा अनधिकृत

मनपाने केल्या जाहीर नवी मुंबई शहरातील 13 शाळा अनधिकृत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com