• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 6, 2015

‘मॅगीबंदी’च्या श्रेयासाठी प्रशासकीय अधिकार्‍यांमध्ये वाद !

adminbyadmin
in देश - विदेश
0
‘मॅगीबंदी’च्या श्रेयासाठी प्रशासकीय अधिकार्‍यांमध्ये वाद !

आग्रा : घराघरांत, मनामनांत आणि प्रत्येक पोटात स्थान मिळवणारी नेस्ले मॅगी आता देशातून हद्दपार होण्याची स्पष्ट चिन्हं असतानाच, या मॅगीबंदीचं श्रेय घेण्यावरून दोन अधिकार्‍यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. मॅगीतील अपायकारक घटक उघडकीस आणण्यासाठी सगळी मेहनत मी केली आणि ’क्रेडीट’ मात्र माझा ‘बॉस’ घेतोय, असा आरोप अन्न निरीक्षक संजय सिंह यांनी केल्यानं उकळत्या मॅगीत वादाची फोडणीच पडली आहे.
दोन आठवड्यांपूर्वी उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये ‘टू मिनिट मॅगी नूडल्स’च्या नमुन्यात अजिनोमोटो आणि शिशाचं प्रमाण अधिक आढळलं आणि मॅगीचे दिवसच फिरले. मॅगी तब्येतीसाठी हानिकारक असल्याची बातमी सर्व माध्यमांतून देशभर पसरली आणि एकेक करता-करता जवळपास सगळ्याच राज्यांनी मॅगीचं ‘पॅक-अप’ केलं. त्यामुळे शेवटी, मॅगीलाच भारतीय बाजारातून माघारीचा निर्णय घेणं भाग पडलं आहे.
मॅगीवरच्या या कारवाईबद्दल अन्न व औषध प्रशासन विभागाचं अभिनंदन होत असतानाच, या खात्यातील दोन अधिकारी आमनेसामने उभे ठाकले आहेत. संजय सिंह आणि व्ही के पांडे यांच्यात श्रेयासाठी वाक् युद्ध सुरू झालंय. ‘श्रेय माझेच आहे’, असा दावा हे दोघंही करताहेत.
नेस्ले इंडियाच्या टू-मिनिट नुडल्सविरोधात जी कारवाई सुरू आहे, ते प्रकरण मीच उघडकीस आणलं, असं संजय सिंह यांनी सांगितलं. अन्न तपासणीचं दैनंदिन काम करत असताना, अब्जावधी रुपयांची उलाढाल करणार्‍या कंपनीला आपण गाशा गुंडाळायला लावू शकू, अशी कल्पनाही कधी केली नव्हती, असंही त्यांनी नमूद केलं. गेले वर्षभर आपण या मोहिमेवर काम करतोय. बाराबंकीच्या बाजारातून 10 मार्च 2014 रोजी मी नमुने गोळा केले. ते गोरखपूर लॅबकडे पाठवले. तेव्हा त्यात शिसं आणि मोनोसोडियम ग्लुटामेटचं प्रमाण जास्त असल्याचा अहवाल आला. त्यानंतर आपण मॅगीशी संपर्क साधला. त्यांच्या मागणीनुसार, कोलकात्याच्या प्रयोगशाळेकडे मॅगी नुडल्सचे नमुने पाठवले. तिथेही तेच निष्पन्न झाल्यानंतर आम्ही मॅगीविरोधात खटला दाखल केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
परंतु, बाराबंकी इथल्या अन्न सुरक्षा विभागात वरिष्ठ अधिकारी असलेले पांडे यांनी सिंह यांचा दावा खोडून काढलाय. प्रशासनात प्रत्येक पदासाठी विशिष्ट काम नेमून दिलेलं असतं. संजयने नमुने गोळा केले आणि ते प्रयोगशाळेकडे पाठवले, हे खरं आहे. पण, तिथून अहवाल आल्यानंतर मी ठोस पावलं उचलल्यामुळेच मॅगीबंदी शक्य झाली आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. या भांडणाची एफडीएमध्ये चमचमीत चर्चा सुरू असून सीनिअर विरुद्ध ज्युनिअर असा सामना तिथे रंगला आहे.

Previous Post

‘घोषवाक्य न राहता स्वच्छतेचा संस्कार झाला पाहिजे’

Next Post

चार वर्षात जयललितांच्या संपत्तीत दुप्पट वाढ

Next Post
चार वर्षात जयललितांच्या संपत्तीत दुप्पट वाढ

चार वर्षात जयललितांच्या संपत्तीत दुप्पट वाढ

एक तरी झाड लावा आणि जगवा – आ. संदीप नाईक

एक तरी झाड लावा आणि जगवा - आ. संदीप नाईक

अभिनेत्यांच्या पत्नींना माझी भीती – सनी लिऑन

अभिनेत्यांच्या पत्नींना माझी भीती - सनी लिऑन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com