• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 12, 2015

जखमी अग्निशमन अधिकार्‍यांची राज ठाकरेंनी ऐरोलीत जाऊन घेतली भेट

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जखमी अग्निशमन अधिकार्‍यांची राज ठाकरेंनी ऐरोलीत जाऊन घेतली भेट

नवी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काळबादेवी आगीतील जखमी सुनील नेसरीकर आणि सुधीर अमिन या अग्निशमन अधिकार्‍यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास राज नवी मुंबईकडे रवाना झाले. सकाळी पावनेदहाच्या सुमारास ऐरोलीतील बर्न हॉस्पिटलमध्ये त्यांनी नेसरीकर आणि अमिन यांच्या तब्बेतीची तज्ज्ञ डॉक्टरांकडून माहिती घेतली. तसेच या दोघांच्याही कुटुंबियांची भेट घेऊन धीर दिला. या घटनेत शहीद झालेल्या महेंद्र देसाई व संजय राणे यांच्या घरी जाऊन त्यांच्याही कुटुंबियांची भेट राज यांच्या पत्नी शर्मिला व मुलगा राज यांनी घेतली होती.
दरम्यान, दुपारी साडेआकराच्या सुमारास राज ठाकरे पुन्हा शहीद अग्निशमन अधिकार्‍यांच्या कुटुंबियांच्या भेटीला गेले. शहीद अग्निशमन अधिकार्‍यांच्या कुटुंबियांना असे वार्‍यावर सोडता येणार नाही. मी मुंबईचे आयुक्त अजेय मेहता यांच्याशी त्यांना विमा, नोकरी व कायमस्वरूपी स्वत:चे घर देण्यात यावे यासाठी चर्चा करणार आहे, असे सांगितले.
मुंबईतील काळबादेवी भागातील गोकुळ इमारतीला लागलेल्या आगीत शनिवारी भायखळ्याच्या ब्रिगेड केंद्राचे प्रमुख महेंद्र देसाई आणि उपप्रमुख संजय राणे शहीद झाले होते. तर या घटनेत सुनील नेसरीकर आणि सुधीर अमिन गंभीर भाजले होते. नेसरीकर या घटनेत 50 टक्के भाजले आहेत तर अमिन 90 टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक 24 तास उपचार करीत आहे. अमिन यांच्यावर आज एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
‘गोकुळ’ दुर्घटनेतील गंभीर जखमी अग्निशमन दलाचे प्रमुख सुनील नेसरीकर आणि उपप्रमुख सुधीर अमीन या लढवय्या अधिकार्यांची मृत्यूशी झुंज सुरूच आहे. अमीन यांची दोन्ही फुफ्फुसे निकामी झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे तर नेसरीकर यांनाही श्‍वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत आहे, असे ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील केसवाणी यांनी सांगितले.
अमीन आणि नेसरीकर यांना शनिवारी पहिल्यांदा मुंबईच्या मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरमध्ये हलविण्यात आले. अमीन हे या आगीत 90 टक्के तर नेसरीकर 50 टक्के भाजले आहेत. या दोन्ही अधिकार्‍यांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांच्या टीमने फक्त दोनच तास विश्रांती घेतली आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्यासाठी आमच्या टीमचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती डॉ. सुनील केसवाणी यांनी दिली.

Previous Post

सेल्स टॅक्स अधिकार्‍याला 20 लाखांची लाच घेताना अटक

Next Post

‘शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश न देणार्‍या शाळांवर कारवाई’

Next Post
‘शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश न देणार्‍या शाळांवर कारवाई’

‘शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश न देणार्‍या शाळांवर कारवाई’

माणसे कमविणे मोठी संपत्ती खासदार आढळराव पाटील

माणसे कमविणे मोठी संपत्ती खासदार आढळराव पाटील

ठाण्यात कॉंग्रेसच्या दोन नगरसेवकांमध्ये ‘राडा’, महापौरांनाही धक्काबुक्की

ठाण्यात कॉंग्रेसच्या दोन नगरसेवकांमध्ये ‘राडा’, महापौरांनाही धक्काबुक्की

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com