• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 22, 2015

घणसोली कॉलनीत मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
घणसोली कॉलनीत मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या घणसोली कॉलनीतील घरौंदामध्ये जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शहरअध्यक्ष गजाजन काळे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी ऐरोली विधानसभा कार्यक्षेत्रातील मनसेचे शहर उपाध्यक्ष गजानन खबाले व निलेश बाणखिले उपस्थित होते.
मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे यांच्या माध्यमातून मनसेचे हे जनसंपर्क कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. घणसोली कॉलनी व घणसोली गाव तसेच सभोवतालच्या नागरी समस्यांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसेने काही महिन्यापूर्वी पालिकेच्या घणसोली विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. समस्यांची पाहणी करण्यासाठी विभाग अधिकार्‍यांनी लेखी स्वरूपात वेळ देवूनही काही राजकीय घटकांच्या दबावामुळे वेळ न पाळल्याने संदीप गलुगडे यांनी घणसोली विभाग कार्यालयाला टाळेही ठोकले होते. गलुगडे यांच्या पाठपुराव्यामुळे काही दिवसापूर्वीच घणसोली कॉलनीत पालिका प्रशासनाला गतीरोधक बसवावे लागले  आहेत. घणसोली कॉलनीत निवडणूकीदरम्यान मनसेसुप्रिमो राज ठाकरे यांची झालेली सभा ही मनसेतील गलुगडेंच्या संघटनात्मक कार्याची पोचपावती मानली जात आहे.
घणसोली कॉलनीतील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला स्थानिक रहीवाशांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. घणसोली कॉलनी हा महापालिका प्रभाग महिला खुला प्रवर्गासाठी राखीव असून या प्रभागातून मनसेच्यावतीने सौ. मंदाताई संदीप गलुगडे  यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. मनसेच्या पालिका निवडणूकीत ज्या प्रभागांमध्ये जिंकण्याची अपेक्षा आहे, त्यामध्ये हा प्रभाग सर्वोच्च स्थानी मानला जात आहे. शहर उपाध्यक्ष बाणखिले व खबाले यांनी श्रीफळ वाढवून व शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी फित कापून कार्यालयाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमास नवी मुंबई देशस्थ, आगरी-कोळी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप खांडगेपाटील, नवी मुंबई लाइव्ह या वेबमिडीयाचे कार्यकारी संपादक सुजित शिंदे, कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर उपस्थित होते. स्थानिक भागातील गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकार्‍यांनीदेखील जनसंपर्क कार्यालयाबाबत संदीप गलुगडे व मंदाताई गलुगडे यांचे अभिनंदन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसेचे घणसोली विभाग अध्यक्ष सतीश केदारे, नितीन नाईक, अक्षय नाईक, प्रताप ताजणे, सागर वाळूंज, पुष्पा सुर्वे, सोनल केदारे यांनी विशेष मेहनत घेतली.

Previous Post

संदीप नाईकांच्या जनाधारावरच ठरणार आगामी महापालिकेची समीकरणे

Next Post

नेरूळमध्ये रंगणार आमदार कुस्ती चषक

Next Post

नेरूळमध्ये रंगणार आमदार कुस्ती चषक

शाळेची रंगरंगोटीसह नागरी आरोग्य केंद्राच्या डागडूजीकरीता शहर अभियंत्यांना साकडे

शाळेची रंगरंगोटीसह नागरी आरोग्य केंद्राच्या डागडूजीकरीता शहर अभियंत्यांना साकडे

अफवा, चावडी गप्पांना पूर्णविराम! गणेश नाईक राष्ट्रवादीतच राहणार !

अफवा, चावडी गप्पांना पूर्णविराम! गणेश नाईक राष्ट्रवादीतच राहणार !

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com