• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 30, 2014

मोबाईल चोरांसाठी रेल्वे विशेष पथक स्थापन करणार!

adminbyadmin
in पनवेल
0
मोबाईल चोरांसाठी रेल्वे विशेष पथक स्थापन करणार!

वर्षभरात रेल्वेत ३ कोटीचे मोबाइल चोरले

अनंतकुमार गवई

मुंबई : रेल्वेचा गर्दीतील प्रवासही आता सुखकर राहीला नसून प्रवासात खिशातील पॉकेटच काय पण आता ‘स्मार्टफोन’ही सुरक्षित राहीला नसल्याचे वर्षभरातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. रेल्वेतील गर्दीत सामान सांभाळायचे, स्वत:ला सांभाळायचे की मोबाईलवर लक्ष ठेवायचे असा संताप रेल्वे प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे. रेल्वे पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर वर्षभरातील मोबाईल चोरीमुळे प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जावू लागले आहे. ‘स्मार्ट फोन’ वापरणार्‍या मुंबईकरांपुढे ’स्मार्ट’ चोरांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मुंबईच्या लोकलमध्ये मोबाइल चोरीचे प्रमाण सर्वाधिक असल्याची बाब समोर आली असून गेल्या वर्षभरात तब्बल पावणे तीन कोटी किंमतीचे मोबाइल चोरट्यांनी लांबवले आहेत. या ’स्मार्ट’ चोरीला आळा घालण्यासाठी आता रेल्वे पोलीस विशेष पथक स्थापन करणार आहे. रेल्वे पोलिसांच्या हद्दीत गेल्या वर्षभरात मोबाइल चोरीच्या १ हजार ३४३ घटना घडल्या. चोरीला गेलेल्या या मोबाइल्सची किंमत २ कोटी ७१ लाखांच्या घरात आहे. २०१३ पेक्षा हा आकडा मोठा आहे. २०१३ मध्ये ९७१ घटनांमध्ये १ कोटी ३७ लाख किंमतीचे मोबाइल चोरीला गेले होते. मोबाइल वापणारे लोकल प्रवाशांना चोरटे ’सॉफ्ट टार्गेट’ बनवत असल्याने तसेच मोबाइल चोरांचा माग काढण्याची डोकेदुखी वाढल्याने रेल्वे पोलीस यावर स्वतंत्रपणे सध्या विचार करत आहेत. सध्या रेल्वे पोलीस ठाण्यातच मोबाइल चोरीचे गुन्हे दाखल करून घेतले जात आहेत आणि तेथील पोलीस त्याचा तपास करत आहेत. मात्र आता हे गुन्हे विशेष पथकाकडे आम्ही देणार आहोत, हे पथक प्रत्येक पोलीस ठाण्याशी समन्वय ठेऊन तपास करेल, असे रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी सांगितले. पोलीस या गुन्ह्यांची उकल सोपी करण्यासाठी सायबर लॅबोरेटरीही स्थापन करणार आहेत. यावर मोबाइल कंपन्यांचीही मदत घेतली जात आहे. हरवलेल्या मोबाइलचा खचएख नंबर मोबाइलवर अपलोड केला गेल्यास चोर पकडला जाण्याची शक्यता वाढेल. हा फोन नक्कीच पुन्हा विक्रीस आणला जातो अशावेळी खचएख नंबरने हा चोरीचा मोबाइल असल्याचे समोर येईल, असे रेल्वे पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे यांनी सांगितले. याशिवाय मोबाइलमध्ये सेक्युरिटी सिस्टिम अपग्रेड करण्याचा आग्रहही पोलिसांनी मोबाइल कंपन्यांकडे धरला आहे. ठाणे आणि कुर्ला रेल्वे स्थानके चोरट्यांचा अड्डा बनलीत, असे ही आकडेवारी सांगते. गेल्या वर्षभरात ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात ४७० तर कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात ४४५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर बोरिवली, दादर (मध्य), वडाळा, वाशी, वांद्रे, चर्चगेट या रेल्वेस्थानकांचा चोर्‍यांमध्ये उतरता क्रम आहे. यात करोडो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. वर्षभरात पाकीटमारीच्या ७०१, सोनसाखळी चोरीच्या २२६ तर पर्सचोरीच्या १९८ घटना घडल्यात. गंभीर बाब म्हणजे या काळात महिला प्रवाशांच्या छेडछाडीच्याही ५० घटना घडल्या आहेत.

Previous Post

मनविसे अध्यक्षांकडून सांस्कृतिकच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन!

Next Post

गोपीनाथ मुंडेंची ‘संघर्ष यात्रा’ रुपेरी पडद्यावर

Next Post
गोपीनाथ मुंडेंची ‘संघर्ष यात्रा’ रुपेरी पडद्यावर

गोपीनाथ मुंडेंची ‘संघर्ष यात्रा’ रुपेरी पडद्यावर

गुरूवारपासून रंगणार कुकशेतच्या मैदानावर क्रिकेटचा थरार

नवी मुंबईकरांच्या निरोगी आयुष्यासाठी आणि सुविधांसाठीच परिश्रम – आ. संदीप नाईक

नवी मुंबईकरांच्या निरोगी आयुष्यासाठी आणि सुविधांसाठीच परिश्रम - आ. संदीप नाईक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com