• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 31, 2014

नवी मुंबईकरांच्या निरोगी आयुष्यासाठी आणि सुविधांसाठीच परिश्रम – आ. संदीप नाईक

adminbyadmin
in ई - पेपर्स
0
नवी मुंबईकरांच्या निरोगी आयुष्यासाठी आणि सुविधांसाठीच परिश्रम – आ. संदीप नाईक

संकल्प नववर्षाचा

नवी मुंबई :  उद्यापासून सुरू होणारे नववर्ष नवी मुंबईकरांच्या आयुष्यात एक आगळीवेगळी पहाट घेवून येणारे ठरो. नववर्षात नवी मुंबईकरांना निरोगी आयुष्यासोबंत सुविधांची कोणतीही कमतरता न भासो व प्रत्येकांच्या घरातील बेरोजगारीचा भस्मासूर नष्ट होवून घरातील सर्वाच्याच चेहर्‍यावर हास्य उमलावे यासाठीच आपण अहोरात्र परिश्रम करणार असल्याचा संकल्प महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा या नावाने ओळखले जाणारे ऐरोलीचे युवा आमदार संदीप नाईक यांनी नववर्षानिमित्त केला आहे.
महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्या नवी मुंबईची आणि माझ्या ऐरोली विधानसभा मतदारसंघाची एक आगळीवेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी आपण सातत्याने परिश्रम करत असल्याचे सांगून आमदार संदीप नाईक पुढे म्हणाले की, नवी मुंबईतील बेरोजगारी संपविणे ही आपली महत्वाकांक्षा आहे. प्रत्येकाच्या घरात चुल पेटली पाहिजे आणि प्रत्येक घरातील हाताला रोजगार वा स्वंयरोजगार उपलब्धच झाला पाहिजे ही आपली भावना असून सर्वप्रथम आपण त्याला प्राधान्य देत आहोत. धनधान्य व संपत्तीबरोबरच सध्याच्या वाढत्या प्रदूषणाच्या विळख्यात निरोगी आयुष्य हीदेखील खर्‍या अर्थांने धनसंपदा बनली आहे. आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा निरोगी आयुष्य जपण्यासाठी परिश्रम केलेही तर कधीही योग्यच. निरोगी आयुष्याचे महत्व मी सातत्याने संपर्कात येणार्‍यांच्या मनावर बिंबवित असतो. घरच्यांसाठी आपले आयुष्य महत्वाचे असल्याने प्रत्येकानेच व्यसनापासून चार हात लांब राहणे काळाची गरज आहे. घरातील माणूस गमाविल्यास खर्‍या अर्थांने त्या घराला अपंगत्व येते आणि त्या घराला सावरण्यास बराच कालावधी जावा लागतो. नवी मुंबईकरांना सातत्याने नागरी सुविधा मुबलक प्रमाणात मिळून नागरी समस्यांचा त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये यासाठी महापालिका कर्मचारी-अधिकार्‍यांबरोबरच खासदार, आमदार, नगरसेवक, त्या त्या पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आदी सर्वांनीच संघठीत होवून प्रयास करणे गरजेचे आहे. कारण नवी मुंबई शहर हे तुम्हा-आम्हा सर्वाचे घर आहे. घराबाबत सर्वांनाच आत्मियता असते. त्यामुळे ज्याप्रकारे आपले घर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आपण परिश्रम करतो, त्याचधर्तीवर नवी मुंबई शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. हक्काबाबत भांडताना कर्तव्याची व जबाबदारीची जाणिव प्रत्येकाने मनाशी बाळगल्यास वाद संपुष्ठात येतील. आगामी वर्षात नवी मुंबईकरांना अधिकाधिक रोजगार व नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी आपण परिश्रम करणार असल्याचा संकल्प नववर्षानिमित्त आमदार संदीप नाईकांनी बोलून दाखविला आहे.

शब्दाकंन :- संजय बोरकर

Previous Post

गुरूवारपासून रंगणार कुकशेतच्या मैदानावर क्रिकेटचा थरार

Next Post

प्रतिक्षा फक्त नववर्षात कोण करणार कधी राजकीय स्थंलातर

Next Post

प्रतिक्षा फक्त नववर्षात कोण करणार कधी राजकीय स्थंलातर

र्निनायकी नवी मुंबई मनविसेकडे आदित्य शिरोडकर लक्ष देणार काय?

र्निनायकी नवी मुंबई मनविसेकडे आदित्य शिरोडकर लक्ष देणार काय?

पीएफ क्रमांकाबाबत कंत्राटी कामगारांच्या नशिबी आजही वनवासच!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com