• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 29, 2014

भाजपा-शिवसेनेचे पदाधिकार्‍यांसह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत

adminbyadmin
in नवी मुंबई
0
भाजपा-शिवसेनेचे पदाधिकार्‍यांसह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत

सुजित शिंदे
नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ एमआयडीसी परिसरातील बोनसरी गाव(प्रभाग-६२) येथील भारतीय जनता पार्टीचे वॉर्ड अध्यक्ष मुबारक फरदीन चुंगिवाले आणि शिवसेनेचे उपशाखा प्रमुख विलास सुरेश घोरपडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकत नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.नवी मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी आणि परिवहन समितीचे माजी सभापती अन्वर शेख यांनी त्यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले. नवी मुंबई शहराच्या विकासाच्यासाठी आपणही यापुढे सक्रीय राहणार असल्याची ग्वाही यावेळी चुंगिवाले आणि घोरपडे यांनी दिली.
नवी मुंबईतील शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या जेष्ठ पदाधिकार्‍यांनी नेहमीच प्रभाग-६२ मधील झुकते माप देत कार्यकर्त्यांना डावलले आहे.पक्षातील अंतर्गत कुरखोडीला कंटाळून आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करीत असल्याचे विलास घोरपडे आणि मुबारक चुंगिवाले यांनी सांगितले. नवी मुंबई शहरात ना.गणेश नाईक यांच्या माध्यमातून यापुढे शहराच्या विकासासाठी त्याच बरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला नवी शहरात अधिक गतीमान करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. तर ना.गणेश नाईक यांनी कोणताही जाती भेद न केलेला नाही. मुस्लिम समाजाला देखीला देखील ना.नाईक यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. त्यांच्या सर्व धर्म समभावनेचा आदर करीत आपण राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचेही मुबारक चुंगिवाले यांनी सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकचे स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकणी आणि अन्वर शेख यांनी ३०० हून अधिक कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले.नवी मुंबई शहरातील नेरुळ एमआयडीसीच्या परिसरातील या कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाने नेहमीच दुय्यम वागणुक दिली आहे. ना.गणेश नाईक, संदीप नाईक, संजीव नाईक यांनी कोणताही जाती भेद, भाषा भेद न करता सर्वांना समान न्याय दिला आहे. त्याच्या दूरदृष्टी विचाराला प्रभावित होऊन भाजपा आणि शिवसेनेला सोडचिठ्ी देत शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत आले आहेत. यापुढे हे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या माध्यमातून नवी मुंबईच्या विकासासाठी कार्यरत
राहतील, असा विश्‍वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी संधीकभाई शेख, रफीक मौला, भास्कर खिल्लारे, विशाल इंगळे, पांडुरंग लहाने, रेखाताई इंगळे, शिवानीताई परदेशी यांच्यासह शेकडो पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

Previous Post

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मुुकादम राष्ट्रवादीमध्ये दाखल

Next Post

वाशीमध्ये शिवसेना खिळखिळी

Next Post
वाशीमध्ये शिवसेना खिळखिळी

वाशीमध्ये शिवसेना खिळखिळी

सानपाडा गावासह सभोवतालच्या परिसरात भगव्याचाच जल्लोष

सानपाडा गावासह सभोवतालच्या परिसरात भगव्याचाच जल्लोष

बुधवारी नेरूळमध्ये सेना-मनसेच्या प्रचाराचा धुराळा उडणार!

बुधवारी नेरूळमध्ये सेना-मनसेच्या प्रचाराचा धुराळा उडणार!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com