• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, June 5, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 1, 2025

विघ्नहर कृषी अमृत हे सेंद्रीय खत ५० किलो बॅग पॅकिंगमध्ये माफक दरात उपलब्ध होणार : सत्यशील शेरकर

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
विघ्नहर कृषी अमृत हे सेंद्रीय खत ५० किलो बॅग पॅकिंगमध्ये माफक दरात उपलब्ध होणार : सत्यशील शेरकर

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

जुन्नर : विघ्नहर सहकारी साखर कारखान्यामार्फत शेतकऱ्यांच्या शेतीमधील मोफत माती परीक्षण करून दिले जाते. चालू लागवड हंगामापासून विघ्नहर कृषी अमृत हे सेंद्रीय खत ५० किलो बॅग पॅकिंगमध्ये माफक दरात उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.

शेतकऱ्यांनी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास योजनांचा लाभ घेऊन जास्तीत जास्त ऊस कारखान्याकडे नोंदवावा. गाळप हंगामात कारखान्यालाच प्राधान्याने ऊस द्यावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी केले आहे.

कारखान्याच्या ५ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पुरस्कार

शेतकऱ्यांना ऊस पिकातील नवनवीन संशोधित तंत्रज्ञान व ऊस पिकामध्ये यांत्रिकीकरणाच्या वापराची माहिती होणेसाठी कारखाना खर्चाने व्हीएसआय आयोजित ज्ञानयाग व ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पाठविले जाते. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एकरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणेची भावना वृध्दींगत होणेसाठी एकरी १०० ते ११० टन ऊस उत्पादन घेणारे शेतकरी तसेच एकरी १११ व त्यापुढे ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते. व्हीएसआयमार्फत देण्यात येणाऱ्या ऊसभूषण पुरस्कारासाठी कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सहभाग नोंदविण्यात येतो. आजवर कारखान्याच्या ५ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

हुमणी किडीचे भुंगेरे जमा करण्याचे आवाहन

कारखान्यामार्फत लागवड हंगाम २००३-०४ पासून हुमणी किडीचा प्रादुर्भाव टाळणेसाठी शेतकरी व मजुरांकडून रोख रक्कम प्रतिकिलो २०० रुपये देऊन हुमणी किडीचे भुंगेरे गोळा करून कारखाना गट ऑफिसला जमा करून कारखाना साईटवर नष्ट केले जातात. सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लागवड हंगाम २०२५-२६ मध्ये २६ मे ते ३० जून २०२५ या कालावधीत हुमणी किडीचे भुंगेरे गोळा करून कारखाना गट ऑफिसला जमा करावेत, असे आवाहन शेरकर यांनी केले आहे.

शेरकर परिवाराने गेली अनेक वर्षे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने जुन्नर तालुक्याच्या आर्थिक विकासामध्ये मोठे योगदान दिलेले आहे. ऊस उत्पादकांसाठी विविध योजना राबविताना ऊसाला अधिकाधिक भाव मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. हुमणी किडीचे भुंगेरे संकलनाच्या माध्यमातून कारखाना व शेरकर परिवार ऊस उत्पादकांची घेत असलेली काळजी कृतीतून पहावयास मिळत असल्याची माहिती उंब्रज नं १ मधील प्रगतीशील शेतकरी नंदकुमार हांडेपाटील यांनी यावेळी दिली.

000000000000000000

नवी मुंबई लाईव्ह वेबसाईटवर बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी Navimumbailive.com@gmail.com

या मेल आयडीवर मेल करावे अथवा ८३६९९२४६४६ या क्रमाकांवर मजकुर व फोटो व्हॉटसअप करण्यात यावे.

Previous Post

रामशेठ ठाकूर हे दानशूरतेसह लोकहिताचे मूर्तिमंत उदाहरण : रवींद्र चव्हाण 

Next Post

लष्करी सामुग्री निर्मितीबाबत मोदी सरकार असंवेदनशील : अनंत गाडगीळ 

Next Post
लष्करी सामुग्री निर्मितीबाबत मोदी सरकार असंवेदनशील : अनंत गाडगीळ 

लष्करी सामुग्री निर्मितीबाबत मोदी सरकार असंवेदनशील : अनंत गाडगीळ 

नेरूळच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणातील जलवाहिनीची गळती थांबवा : संदीप खांडगेपाटील

नेरूळच्या तानाजी मालुसरे क्रिडांगणातील जलवाहिनीची गळती थांबवा : संदीप खांडगेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com