स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील तानाजी मालुसरे क्रिडांगणातील जलवाहिनीची गळती थांबविण्याची लेखी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात महापालिकेचे तानाजी मालुसरे क्रिडांगण व राजमाता जिजाऊ उद्यान आहे. महापालिका क्रिडांगण व लगतच्या नेरूळ सीव्ह्यू या सिडकोच्या सोसायटीमध्ये संरक्षक भिंत आहे. या भिंतीलगतच महापालिकेची जलवाहिनी गेल्या काही दिवसापासून फुटलेली आहे. सकाळी व सांयकाळी ज्यावेळी पाणी येते, त्यावेळी या फुटलेल्या जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी क्रिडांगणात येते. त्यावेळी क्रिडांगणात पाणी साचलेले असते. त्यामुळे मुलांना या क्रिडांगणात खेळता येत नाही. हे पाणी जॉगिंग ट्रॅकवरुन वाहत असल्याने चालण्यासाठी येणाऱ्या काही स्थानिक महिला त्या ठिकाणी पाय घसरुन पडल्या आहेत व त्यांना किरकोळ दुखापतीही झाल्या आहेत. दररोज शेकडो लीटर होत असलेली पाण्याची नासाडी, क्रिडांगणामध्ये साचणारे पाणी, जॉगिंग ट्रॅकवर चालताना पाय घसरुन होणाऱ्या दुखापती पाहता संबंधितांना त्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
या उद्यानात मुलांचा खेळण्याचा झोपाळा गेल्या काही महिन्यापासून तुटलेला आहे. तो दुरुस्तीसाठी गेली काही महिन्यापासून सातत्याने लेखी पाठपुरावा करुनही महापालिका प्रशासनाकडून या झोपाळ्याची दुरुस्ती होत नाही. मुलांच्या परिक्षा संपल्या, सुट्ट्या संपल्या, शाळा सुरु झाल्या तरी झोपाळ्याची डागडूजी महापालिका प्रशासनाकडून केली जात नाही. तरी संबंधितांना योग्य ते निर्देश देवून झोपाळ्याची डागडूजी करण्याचे निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
०००००
नवी मुंबई लाईव्ह वेबसाईटवर बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी Navimumbailive.com@gmail.com
या मेल आयडीवर मेल करावे अथवा ८३६९९२४६४६ या क्रमाकांवर मजकुर व फोटो व्हॉटसअप करण्यात यावे.