नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ६ परिसरात गटारांमधील काढलेला कचरा तातडीने उचलण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
पावसाळीपूर्व कामाचा भाग म्हणून महापालिका प्रशासनाकडून नेरूळ सेक्टर सहा परिसरात गटारातील माती, अडकलेला कचरा, गाळ काढण्याचे काम सुरु आहे. तथापि गटारातील गाळ, कचरा, माती काढल्यावर त्याचे गटारालगतच रचलेले ढिगारे पाच-सहा दिवसानंतरही हटविण्याची तत्परता दाखविली जात नाही. त्यामुळे पावसामध्ये ती माती, गाळ पुन्हा गटारामध्ये वाहून जात आहे. गटारातील कचरा, माती, गाळ बाहेर काढून ठेवल्याने त्याची दुर्गंधी स्थानिक नागरिकांना सहन करावी लागत आहे. त्या दुर्गंधीतूनच ये-जा करावी लागत आहे. त्यातच समाजमंदिर ते मच्छिमार्केट रोड हा सर्वाधिक वर्दळीचा भाग असून त्या मार्गावर दुकानासमोरच हे कचऱ्याचे ढिगारे आहेत. दुर्गंधीने लोक त्रस्त झाले आहेत. हे सहा दिवसानंतर हे ढिगारे हटविले गेले नाहीत. मातीचे ढिगारे तातडीने हटविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.