अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २, ४ तसेच जुईनगर नोडमधील पथदिव्यांच्या दुरुस्तीची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर २, ४ तसेच जुईनगर नोडमधील रस्त्यावरील, पदपथावरील तसेच अंर्तगत भागातील पथदिव्यातील दिवे अनेक ठिकाणी दिवे बंद आहेत. जे सुरु आहेत, त्यातून पूर्ण प्रकाश न येता अंधूकसा प्रकाश येत आहे. त्यामुळे दिवे सुरु असूनही अंधारच पडतो. कालपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. नेरूळ सेक्टर २, ४ तसेच जुईनगर नोडमध्ये नादुरुस्त पथदिव्यांची समस्या गंभीर झालेली आहे. अंधारात समाजविघातक अपप्रवृत्तींकडून महिला व मुलींबाबत दुष्कृत्य होण्याची भीती आहे. वाटमारी,लुटमार होण्याचीही शक्यता आहे. समस्येचे गांभीर्य पाहता संबंधितांना नादुरुस्त पथदिव्यांच्या समस्येचे निवारण करण्याचे निर्देश देण्याची मागणी श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.