• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 3, 2025

शेकडो सिडको सोडतधारकांना घेऊन मनसेचा सिडकोवर ‘इंजेक्शन मोर्चा’

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
शेकडो सिडको सोडतधारकांना घेऊन मनसेचा सिडकोवर ‘इंजेक्शन मोर्चा’

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail,com

नवी मुंबई : सिडकोने २६ हजार महाग घरांच्या किंमती कराव्या म्हणून हजारो सिडको सोडतधारकांनी गुरुवारी मनसे प्रवक्ते व शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर येथील सिडको भवनवर भव्य इंजेक्शन मोर्चा काढला. काल सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सह व्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल, सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्याशी झालेल्या चर्चेत घरांच्या किंमती कमी करण्याबाबत नकारात्मक होते. त्यामुळे सिडको सोडतधारक मोठ्या प्रमाणात नाराज होते. सिडकोच्या या अडेलतट्टू वागण्याच्या विरोधात मनसेच्या नेतृत्वाखाली सिडको सोडतधारकांनी राज्य सरकार व सिडको प्रशासनाविरुद्ध गुरुवारी एल्गार पुकारला. हजारोंच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष हे स्वतःच्या कुटुंबासह रखरखत्या उन्हात मोर्चात सहभागी होते. मोर्चा मधील सहभागी नागरिकांनी हातात इंजेक्शन घेऊन सिडको प्रशासनाला इंजेक्शन द्यायची गरज आहे असे मत मोर्चातील सहभागी नागरिकांनी मांडले. आता तर इंजेक्शनची सुई टोचून आम्ही सिडकोला जागरूक करत आहोत. पण सिडकोचे धोरण असेच राहिले तर यापुढे आंदोलनाचा पवित्रा तीव्र असेल असा इशारा गजानन काळे यांनी दिला.

परवडणाऱ्या घराची जाहिरात काढून अत्यंत महाग घरे विक्रीसाठी काढून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केल्याची भावना मोर्चा मध्ये दिसून आली. बेलापूर येथील भूमिराज टॉवर, सेक्टर-३० येथे सुरू झालेला मोर्चा सिडको भवनच्या दिशेने गेला. पोलिसांनी मोर्चा सिडको भवन येथील सिग्नलवर अडवला व तो मोर्चा अर्बन हाट येथे नेण्यात आला.

प्रशासनाचा निषेध करत सिडको सोडतधारकांनी एक छोटे घर बांधले होते. मोर्चाच्या ठिकाणी महिलांनी चूल मांडून तिथेच जेवण करायला सुरुवात केली. सिडको जर आम्हाला परवडणारे घर देत नाही तर आम्ही इथेच घर बांधून राहतो असा पवित्रा मोर्चातील महिलांनी घेतला होता. सिडको प्रशासनाचा बराच वेळ कोणताही प्रतिसाद येत नसल्याने सिडको सोडतधारक आक्रमक झाले होते. सकाळी १० वाजता उन्हात सुरू झालेला मोर्चा दोन वाजले तरी सिडको प्रशासन ढिम्म असल्याचे पाहून गजानन काळे यांनी सोडत धारकांना ‘जेल भरो’ आंदोलन करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला उपस्थित हजारो सिडको सोडतधारकांनी जल्लोषात प्रतिसाद देऊन स्वतःला अटक करून घेण्याचे निश्चित केले. मनसेचा हा आक्रमक पवित्रा पाहून पोलिस व सिडको प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यानंतर बऱ्याच वाटाघाटी झाल्यानंतर सिडको प्रशासनाने घर निश्चित करण्यासाठी पुष्टीकरण रक्कम भरण्यासाठी २८ दिवसांची मुदतवाढ दिली. मोर्चाचे फलित म्हणून सर्व सिडको सोडतधारकांनी हा निर्णय मान्य केला. यामुळे पुढचा लढा लढण्यासाठी अजून वेळ मिळाली. यापुढील वेळेचा सदुपयोग करून राज ठाकरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे हा विषय घेऊन जाणार अशी घोषणा गजानन काळे यांनी केली. तसेच उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन हा विषय सोडवणार असा विश्वास गजानन काळे यांनी सिडको सोडतधारकांना दिला. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसांत सिडको सोडतीमधील सिडकोने केलेल्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करण्याचा निश्चय गजानन काळे यांनी व्यक्त केला. पुढील आठवड्यात वाशी येथे सिडको समस्यांचे भव्य प्रदर्शन मनसेतर्फे आयोजित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाला महाराष्ट्रातील २८८ आमदार, सर्व खासदार, मंत्री तसेच नवी मुंबईतील नगरसेवक, सिडको अधिकारी यांना निमंत्रण देणार असल्याचे गजानन काळे यांनी घोषित केले.

मनसेच्या या मोर्चात महिला सेना शहर अध्यक्ष डॉ. आरती धुमाळ, शहर सचिव विलास घोणे, सचिन कदम, शहर सह सचिव अभिजीत देसाई, विभाग अध्यक्ष अक्षय भोसले, अमोल आयवळे, शाम ढमाले, सागर विचारे, रोजगार विभाग शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर, चित्रपट सेना शहर संघटक अनिकेत पाटील, विभाग सचिव अक्षय कदम, उपविभाग अध्यक्ष राजेंद्र खाडे, महिला सेना विभाग अध्यक्ष नंदा मोरे, मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक व हजारोंच्या संख्येने सिडको सोडतधारक उपस्थित होते.

Previous Post

सिडकोचे जाचक हस्तांतरण शुल्क रद्द करून घरे फ्री होल्ड करण्याची संदिप नाईक यांची मागणी

Next Post

काव्या मारनच्या हैदराबाद संघाचा आयपीएलमध्ये सलग तिसरा पराभव

Next Post
काव्या मारनच्या हैदराबाद संघाचा आयपीएलमध्ये सलग तिसरा पराभव

काव्या मारनच्या हैदराबाद संघाचा आयपीएलमध्ये सलग तिसरा पराभव

पदोन्नतीनंतर क्रिम पोस्टींग सुटेना

पदोन्नतीनंतर क्रिम पोस्टींग सुटेना

कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीचा निर्णय लवकर घ्या : माथाडी नेते पांडुरंग आमले यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

सानपाड्यातील नागरी समस्या सोडविण्यास पालिकेची चालढकल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com