• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 4, 2025

पदोन्नतीनंतर क्रिम पोस्टींग सुटेना

adminbyadmin
in पनवेल
0
पदोन्नतीनंतर क्रिम पोस्टींग सुटेना

नगरपरिषद संचालनालयाच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात
मुंबई :  राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था चालवण्याकरिता महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नगरपरिषद संचालनालयाने काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांची केलेली पदोन्नती संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सहाय्यक आयुक्त पदावरील अधिकारी आणि मुख्याधिकारी ब गटाचील अधिकाऱ्यांना पदोन्नती दिल्यानंतर या अधिकाऱ्यांना त्याच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठेवण्याची मेहरबानी काही अधिकाऱ्यांवर दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे स्विय सहाय्यक असलेल्या एका अधिकाऱ्याचे त्याकरीता नाव वापरल्याची चर्चा अधिकारी वर्गात रंगली आहे.     नगरविकास विभागाने २० मार्चला महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट-ब, सहायक आयुक्त, गट-ब संवर्गातून मुख्याधिकारी, गट-अ, सहायक आयुक्त, गट-अ संवर्गात ताप्तूरती पदोन्नती व पदस्थापना केली आहे. कोकण, नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या महसुली भागात सुमारे १०३ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीनंतर बदली करण्यात आली. यापैकी कोकणातील काही मोजक्या अधिकाऱ्यांवर नगरविकास विभागाने खास मर्जी दाखवली आहे. एकाच जागेवर एकच अधिकारी पदावर राहील्यास बाहेरील घटकांसोबत आणि कनिष्ट अधिकाऱ्यांसोबत लागेबांधे निर्माण होऊन भ्रष्टाचारास वाव मिळतो. या धारणेमुळे प्रशासनाकडून अशा अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदली केली जाते. अथवा दुसऱ्या विभागात बदली केली जाते. मात्र नगरविकास विभाग आणि नगरपरिषद संचालनालयाकडून सरकार नियमांना तिलांजली दिली गेली आहे. नगरपरिषद संचालनयातून नियुक्त केलेल्या अधिकारी हे सहाय्यक आयुक्त अथवा मुख्याधिकारी ब गट असताना त्यांची पदोन्नती अ गटावर केली. हे नियमानुसार केले. आता मुख्याधिकारी ब गट हे सहाय्यक आयुक्त या पदाशी समकक्ष आहेत. व मुख्याधिकारी अ गट हे उपायुक्त या पदाशी समकक्ष आहेत. अनेक मुख्याधिकाऱ्यांच्या ब गटातून अ गटात पदोन्नती झाली आहे. परंतू त्यांची त्यासोबत बदली होणे क्रमप्राप्त आहे. बदल्यांचे विनियमन व विलंबास प्रत्यवाय अधिनियम अंतर्गत दर तीन वर्षांनी बदली होणे अपेक्षित आहे. पण या मुख्याधिकाऱ्यांच्या बाबतीत त्याच महापालिकेतील सहाय्यक आयुक्ताची पदोन्नती होऊन त्याच महापालिकेत उपायुक्त म्हणून नियुक्ती दिली गेलेली आहे. किंवा मुख्याधिकारी ब गटातून अ गटात पदोन्नती दिली. तरी त्याच नगरपरिषदेत नियुक्ती दिली गेलेली आहे. पनवेल महापालिकेत सहायक आयुक्त या पदावर असणारे स्वरुप खारगे हे मालमत्ता कर विभागात सहायक कर निर्धारक गेले काही वर्षांपासून कार्यरत आहेत. असे असताना त्यांची सहायक आयुक्त पदावरून उपायुक्त पदावर बढती मिळाल्यानंतर पुन्हा रिक्त असलेल्या उपायुक्त पदावर नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे खारगे यांना पुन्हा ते कार्यरत असलेले करनिर्धारक पदावरुनही बढती देत आता मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त हे पद बहाल करण्यात आले आहे. या पदावर बाहेरून इतर अधिकारी देखील येऊ शकत असताना नगरविकास विभाग आणि् महापालिका आयुक्तांनी खरगे यांच्यावर विशेष प्रेम दाखवला. यासारखेच उरण नगरपरिषदेही झाले आहे. उरण नगरपरिषदेवर काही वर्षांपासून समीर जाधव मुख्याधिकारी कार्यरत आहेत. पूर्वी हे पद ब दर्जाचे होते. आता नगरपरिषद संचालनालयाने अ केले. तसेच जाधव यांनाही बढती अ गटावर देण्यात आली. जणूकाही जाधव यांच्यासाठीच उरण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाची बढती अ दर्जाच्या गटात केल्याची चर्चा उरण नगरपरिषदेमध्ये रंगली आहे. पनवेल महापालिका आणि उरण नगरपरिषदेत झालेल्या नियुक्त्या या नगरपरिषद अधिनियमाच्या विरुद्ध आहे. परंतू नगरपरिषद संचालनायातील अधिकारी व पदोन्नत झालेले मुख्याधिकारी यांनी एकमेकांशी साटेलोटे करुन लाभाची पदे पदरात पाडून घेतल्याची चर्चा रंगली आहे. पदोन्नती झालेले अधिकारी राज्यातील इतर २६ महापालिकांमध्ये रिक्त पदांवर हे पदोन्नती झालेले अधिकारी जाऊ शकतात. मात्र रोज फाईलींमागे मिळणारी मलई आणि वरिष्ठांसोबत निर्माण झालेले सौहार्दपूर्ण संबंधांमुळे हे अधिकारी जनतेची लुट करण्यासाठी लादले गेले असल्याचे बोलले जात आहे.

 

जीडीचा आशिर्वाद महत्वाचा
नगरविकास विभागाने काही वर्षांपूर्वी पनवेल महापालिकेवर आयुक्त म्हणून पाठवलेला उपायुक्त दर्जाचा अधिकारी जीडी म्हणून नगर संचालनालयात आणि नगर विकास विभागात प्रसिद्ध आहे. कोल्हापूरचे संबंध आणि तत्कालिन मुख्यमंत्र्यांसोबत असलेली जवळीक वापरून हा अधिकारी एमएमआर मध्येच राहत आहे. गेल्या पाच वर्षांपेक्षा अधिक काळ हा अधिकारी ठाणे, पनवेल आणि आता सिडको अशा महत्वांच्या प्राधिकरणांवर मोठ्या पदांवर राहीलेला आहे. सध्या आयएएस अशा पदांच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदावर कार्यरत असणारा हा अधिकारी पनवेल आणि उरण मधील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती मागे असल्याची चर्चा अधिकारी वर्गात रंगली आहे.

Previous Post

काव्या मारनच्या हैदराबाद संघाचा आयपीएलमध्ये सलग तिसरा पराभव

Next Post

सानपाड्यातील नागरी समस्या सोडविण्यास पालिकेची चालढकल

Next Post
कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीचा निर्णय लवकर घ्या : माथाडी नेते पांडुरंग आमले यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

सानपाड्यातील नागरी समस्या सोडविण्यास पालिकेची चालढकल

कोपरखैराणेतील डम्पिंग ग्राऊंडवर कचरा वाहतुक कर्मचाऱ्यांचे आंदोलन

कोपरखैराणेतील डम्पिंग ग्राऊंडवर कचरा वाहतुक कर्मचाऱ्यांचे आंदोलन

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा: हर्षवर्धन सपकाळ 

शेतकऱ्यांच्या आत्महत्येस फडणवीस सरकारच जबाबदार, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: हर्षवर्धन सपकाळ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com