• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 17, 2024

वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा

छगन भुजबळांचा समर्थंकांसमोर अजित पवारांवर संताप व्यक्त
येवला (प्रतिनिधी): वाह रे, दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा, असे म्हणत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना आपल्या समर्थकांसमोर त्यांनी आपल्या कार्याचा लेखाजोखाच मांडला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार, अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. यामुळे छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले असून नागपूरचे हिवाळी अधिवेशन सोडून ते नाशिकमध्ये दाखल झाले. यानंतर आज छगन भुजबळ यांनी येवल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
येवल्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की, तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत येवला-लासलगावचा किल्ला आपण लढवला, तुमचे आभार. भुजबळ साहेब निवडून येणार नाहीत, असे आमच्या राष्ट्रवादीत बोलणे चालले होते. देशात जो प्रयोग झाला नाही तो प्रयोग आपण येवल्यात घडवला. १६०किलोमिटर लांबून पाणी आणलं. पाण्याचा प्रकल्प अजून पूर्ण झाला नाही, तो पूर्ण करायचा आहे. तालुक्याच्या विकासासाठी सगळ्यांना सोबत घ्यायचे आहे. आपल्याला एकत्रित काम करायचे आहे. नगर परिषद, जिल्हा, पंचायत समिती यात आपण आपली ताकद दाखवून देणार आहे, असे भुजबळ यावेळी म्हणाले.
छगन भुजबळ काय लल्लू पाटील आहे का?
आठ दिवसांपूर्वी समीर भुजबळांना पटेल, तटकरे यांनी बोलवले. नितीन पाटील यांचा राजीनामा घेवून भुजबळ साहेबांना राज्यसभेवर पाठवू, असे सांगितले. मकरंद पाटील यास मंत्रिपद द्यायचे अन् त्याच्या भावाला खाली बोलवायचे. हा काय पोरखेळ आहे का? लोकांनी मला निवडून दिले, त्यांना मी काय तोंड काय देवू. त्यांना भुजबळांचा बळी घ्यायचा होता का? छगन भुजबळ काय लल्लू पाटील आहे का? हा काही पोरखेळ आहे का? माझ्या मनात मंत्री पदाची शंका होती, अन् त्याप्रमाणे झाले. माझी जर किंमत होत नसेल तर काय उपयोग? दादाचा वादा. वाह रे दादाचा वादा, कसला वादा, अन् कसला दादा, असे म्हणत छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला आहे.

Previous Post

समुद्राची सुरक्षा वाऱ्यावर, गस्त घातली जात नाही : आमदार निलेश राणे

Next Post

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड  

Next Post
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड  

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड  

शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

डीवाय पाटील स्टेडिअममधील कोल्ड प्लेच्या नियोजित कार्यक्रमाविरोधात काँग्रेस आक्रमक

‘त्या’ धडकेने पसरली शोककळा

‘त्या’ धडकेने पसरली शोककळा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com