• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 1, 2024

नवी मुंबई महानगरपालिका उत्पन्न वाढीसाठी टास्क फोर्स

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कुकशेत गावातील महापालिका विभाग कार्यालयातील लिफ्टमध्ये तब्बल दीड तास अडकला पाणीपुरवठा कर्मचारी

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :  महापालिकेच्या उत्पन्नवाढीकडे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी बारकाईने लक्ष देत विशेष कार्यबळाची अर्थात टास्क फोर्सची स्थापन केली असून ही पाच सदस्यीय समिती महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्याकरिता उपाय सुचविणार आहे. त्यामध्ये थकबाकी वसूलीकरिता व विद्यमान वसूलीकरिता नियोजन करुन सोबतच उत्पन्नवाढीचे नवीन स्त्रोत सूचित करणार आहे. याबाबतचा अहवाल १५ दिवसात सादर करण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले आहेत.

अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा टास्क फोर्स कार्यरत असणार असून मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मालमत्ता कर विभागाचे उप आयुक्त शरद पवार, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, सहा. संचालक नगररचना सोमनाथ केकाण असे चार सदस्य महापालिकेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नियोजन करणार आहेत.

उत्पन्नवाढीसाठी उपाय सूचविताना टास्क फोर्सने विद्यमान कार्यपध्दतीमध्ये कोणते बदल करावे लागतील याच्या सूचना कराव्यात व असे बदल केल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशा पध्दतीने व किती दिवसात करता येईल आणि कधीपासून उत्पन्नवाढ होईल हे प्रस्तावात नमूद करावे असे सूचित करण्यात आलेले आहे.

थकबाकी, चालू वसूली व नवीन स्त्रोतामधून अपेक्षित वाढ याचे नियोजन सादर करण्याच्याही सूचना देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय खर्चात बचत ही एक प्रकारे उत्पन्नवाढ असून त्यादृष्टीने आवाजावी खर्च टाळून व आवश्यक तेथे काटकसर करुन खर्चामध्ये किती बचत होईल याचीही माहिती सादर करण्याचे आदेशात नमूद आहे.

त्यासोबतच शक्य आहे तेथून शासन निधी प्राप्त करुन घेण्यासाठी करावयाचे प्रयत्न आणि अशी कामे शासन निधीतून करुन महानगरपालिकेचा निधी इतर सुविधा कामांसाठी वापरण्याबाबत सूचना कराव्यात असे सूचित करण्यात आले आहे. दुबार योजनांचा शोध घेऊन त्या योजना बंद करण्याबाबत अभिप्राय द्यावेत तसेच इतर महानगरपालिकांमध्ये राबविण्यात येणा-या उत्पन्न वाढीच्या चांगल्या कार्यपध्दती अभ्यासून त्यांचे अनुकरण करण्याबाबत सूचना कराव्यात असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

उत्पन्नवाढीबाबत विविध विभागांकडून प्राप्त होणा-या प्रस्तावांचे सविस्तर अवलोकन करुन टास्क फोर्सने महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीचा विभागनिहाय प्रस्ताव सादर करावा, तसेच त्याच्या अंमलबजावणीचे नियोजन करावे आणि त्याबाबतचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर करावा असे आदेशात सूचित करण्यात आले आहे.

महापालिकेस विविध करांतून प्राप्त होणाऱ्या महसुलातूनच विविध नागरी सुविधांची परिपूर्ती केली जात असल्याने नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीकडे विशेष लक्ष दिले आहे. आयुक्तांमार्फत प्रत्येक विभागामार्फत होणाऱ्या करवसूलीचा नियमित आढावा घेण्यात येत असतो. आता उत्पन्नवाढीसाठी आयुक्तांनी टास्क फोर्सची स्थापना केली असून या माध्यमातून महानगरपालिकेचे आर्थिक सक्षमीकरण होणार आहे व त्यातून नवी मुंबईकरांना अधिक उत्तम व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

Previous Post

आजपासून रंगणार पाचवी अर्जुन मढवी स्मृती महिला क्रिकेट स्पर्धा

Next Post

आयएमआयएम सह धनगर समाजाचा आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांना पाठिंबा

Next Post
आयएमआयएम सह धनगर समाजाचा आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांना पाठिंबा

आयएमआयएम सह धनगर समाजाचा आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांना पाठिंबा

निवडणूक आयोगाचा जनतेच्या मतांवर दरोडा : नाना पटोले

काँग्रेस पक्षाचा कंत्राटी नोकर भरतीला तीव्र विरोध

कामे तात्काळ करा अन्यथा मनसे आंदोलन करेल : गजानन काळे

कामे तात्काळ करा अन्यथा मनसे आंदोलन करेल : गजानन काळे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com