• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 1, 2024

आजपासून रंगणार पाचवी अर्जुन मढवी स्मृती महिला क्रिकेट स्पर्धा

adminbyadmin
in ठाणे
0
आजपासून रंगणार पाचवी अर्जुन मढवी स्मृती महिला क्रिकेट स्पर्धा

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

ठाणे : डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिस्नस्व आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी महिलांच्या क्रिकेट स्पर्धेला आजपासून (सोमवार) सुरुवात होत आहे. यंदा प्रथमच स्पर्धेतील सामने मर्यादित ४० षटकांचे खेळवले जाणार असून मुंबई क्रिकेट संघटनेने आगामी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांकरता दिलेला निवड चाचणीचा दर्जा हे स्पर्धेचे वैशिष्ट्य असल्याचे स्पर्धेचे प्रमुख आयोजक डॉ. राजेश मढवी यांनी सांगितले.
स्पर्धेबाबत माहिती देताना डॉ राजेश मढवी म्हणाले महिला क्रिकेटला पुढावा देण्यासाठी आयोजीत करण्यात येणारी ही स्पर्धा गेली चार वर्षे टी -२० प्रारूपात खेळवण्यात येत होती. पण, यावेळी मुंबई क्रिकेट संघटनेने दिलेल्या निर्देशानुसार सामने ४० षटकांची बाद पध्दतीने खेळवण्यात येतील. या स्पर्धतून यंदाच्या मोसमातील राष्ट्रीय स्पर्धेकरता मुंबई क्रिकेट संघटनेचे १९ वर्ष वयोगट आणि वरीष्ठ महिला गटाचे प्रातिनिधिक संघ निवडले जाणार आहेत. मुंबईतील आघाडीच्या बारा संघांना स्पर्धेत प्रवेश देण्यात आला आहे. त्यात गतविजेते राजावाडी क्रिकेट क्लब, उपविजेते रिगल क्रिकेट क्लबसह माटुंगा जिमखाना, स्पोर्टिंग यूनियन क्लब, दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन, दहिसर स्पोर्ट्स क्लब, व्हिक्टरी क्रिकेट क्लब, भारत क्रिकेट क्लब, पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन, ग्लोरियस क्रिकेट क्लब, स्पोर्ट्स फिल्ड क्रिकेट क्लब, पय्याडे क्रिकेट क्लब आदी संघाचा समावेश आहे. माजी आंतराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि मुंबई क्रिकेट संघटनेच्या महिला संघाच्या विद्यमान निवड समिती प्रमुख लाया फ्रान्सिस यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. निवड चाचणीचा दर्जा असल्याने स्पर्धेतील सामने रंगतदार होतील त्यामुळे ठाणेकर क्रिकेटप्रेमींनी मोठया संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन डॉ राजेश मढवी यांनी केले आहे.

Previous Post

विघ्नहरची निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार

Next Post

नवी मुंबई महानगरपालिका उत्पन्न वाढीसाठी टास्क फोर्स

Next Post
कुकशेत गावातील महापालिका विभाग कार्यालयातील लिफ्टमध्ये तब्बल दीड तास अडकला पाणीपुरवठा कर्मचारी

नवी मुंबई महानगरपालिका उत्पन्न वाढीसाठी टास्क फोर्स

आयएमआयएम सह धनगर समाजाचा आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांना पाठिंबा

आयएमआयएम सह धनगर समाजाचा आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांना पाठिंबा

निवडणूक आयोगाचा जनतेच्या मतांवर दरोडा : नाना पटोले

काँग्रेस पक्षाचा कंत्राटी नोकर भरतीला तीव्र विरोध

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com