• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 24, 2024

प्रकल्पग्रस्तांची बांधकामे जमिनीच्या मालकी हक्कासह नियमित करून शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी : संदीप नाईक

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
प्रकल्पग्रस्तांची बांधकामे जमिनीच्या मालकी हक्कासह नियमित करून शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी : संदीप नाईक

Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांची, गरजवंतांची  बांधकामे जमिनीच्या मालकी हक्कासह  (फ्री होल्ड) नियमित करून शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी माजी आमदार तथा नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केली आहे.

अशा मागणीचे पत्र  लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री, दोन्ही  उपमुख्यमंत्री, सिडको अध्यक्ष, नगर विकास सचिव,  सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना पाठवले आहे. गरजे पोटीची निवासी आणि उपजीविकेसाठी करण्यात आलेली प्रकल्पग्रस्तांची  बांधकामे नियमित करण्याच्या शासन निर्णयावर प्रतिक्रिया देताना संदीप नाईक म्हणाले, प्रकल्पग्रस्तांची मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाण क्षेत्रातील बांधकामे नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचे आम्ही अभिनंदन करतो. वास्तविक जमिनीच्या मालकी हक्कासह बांधकामे नियमित व्हायला पाहिजेत. जमिनी फ्री होल्ड व्हायला पाहिजेत. यासाठी लोकनेते आमदार गणेश नाईक सातत्याने  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शासन, नगर विकास खाते, सिडको आणि संबंधित प्राधिकरणांकडे पाठपुरावा करीत आहेत. विधानसभेच्या अधिवेशनांमधून त्यांनी लक्षवेधी सूचना, तारांकित प्रश्न, औचित्याचा  मुद्दा, अर्धा तास चर्चा या माध्यमातून  आवाज उठवला आहे. बैठका घेतलेल्या आहेत. अखेर गरजेपोटीची बांधकामे नियमित करण्याचा जीआर शासनातर्फे काढण्यात आला. प्रकल्पग्रस्तांना जमिनीची मालकी द्यावी ही प्रमुख मागणी होती. २२ सप्टेंबर २०२४ रोजी ऐरोली येथे कोळी भवनाच्या भूमिपूजन समारंभप्रसंगी उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ पुन्हा एकदा लोकनेते आमदार नाईक यांनी जमिनीच्या मालकी हक्कासह बांधकामे नियमित करण्याची मागणी केली. यावेळी केलेल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालकी हक्काने प्रकल्पग्रस्तांची  बांधकामे नियमित करण्यात येतील, असे जाहीर केले आहे. परंतु निघालेल्या जीआरमध्ये जमिनीचा भाडेपट्टा होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तरी हा भाडेपट्टा न करता जमिनीची मालकी प्रकल्पग्रस्तांना द्यावी. त्या अनुषंगाने जीआरची  अंमलबजावणी करावी. प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित करताना ० ते २५० चौरस मीटरपर्यंत १५ टक्के आणि २५१ ते ५०० चौरस मीटरपर्यंत २५ टक्के आणि ५०१ चौरस मीटर पेक्षा अधिक जमीनक्षेत्राला ३०० टक्के दर आकारण्यात येणार आहे. परंतु एखाद्याचे शेत मूळ गावठाणापासून जवळ असेल त्यांनी तेथे  घरे बांधली. एखाद्याचे शेत ५०० चौरस मीटर अंतरावर किंवा त्यापेक्षा अधिक अंतरावर असेल  त्याने तेथे घर बांधले असेल. त्यामुळे दरामध्ये दुजाभाव न ठेवता सर्वांना एकसमान १५ टक्के दर आकारण्यात यावा. बांधकामे नियमितीकरणासाठी पैसे भरण्याकरता प्रकल्पग्रस्तांना पुरेशी आणि योग्य मुदत देण्यात यावी. प्रकल्पग्रस्तांना बांधकामे विकसित करायची असल्यास त्यांना चांगल्या परिस्थितीमध्ये ती विकसित करता आली पाहिजेत. सर्व घटकांना सामावून घ्यावे, एकही घटक वंचित राहता कामा नये. शासन निर्णयाची अंमलबजावणी कालबद्ध पद्धतीने योग्यरीत्या व्हायला पाहिजे. शासन निर्णयामध्ये या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची विनंती पत्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आलेली आहे.

Previous Post

नवी मुंबईतील जमिनी फ्री होल्ड करण्याची विजय नाहटा यांची सिडकोकडे मागणी

Next Post

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून विविध विकास कामांचा भूमिपूजन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते उत्साहात

Next Post
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून विविध विकास कामांचा भूमिपूजन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते उत्साहात

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून विविध विकास कामांचा भूमिपूजन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते उत्साहात

महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे पाप जनता विसरलेली नाही : नाना पटोले.

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची पदावरून तात्काळ हकालपट्टी करा : नाना पटोले

शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

हेलिओस बाजार आणि थॉटरेन्स डिझायनर प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांकडून सिडकोने १५० कोटी रूपये पुन्हा वसूल करण्याची कॉंग्रेसची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com