• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 13, 2024

सुवर्णमहोत्सवी वर्षाची  ‘एक गाव एक गणपती’ परंपरा जपणारे आदर्शवत रिटघर गाव

adminbyadmin
in रायगड
0
सुवर्णमहोत्सवी वर्षाची  ‘एक गाव एक गणपती’ परंपरा जपणारे आदर्शवत रिटघर गाव

विठ्ठल ममताबादे : Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६

उरण : मराठी परंपरेत गणेश उत्सव हा केवळ उत्सव नसून तो श्रद्धा,संस्कृती आणि एकात्मतेचा  खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप आहे. ह्या उत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व खूप मोठे आहे. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाचे घरगुती पूजेचे भव्य सार्वजनिक कार्यक्रमा रूपांतर केले आणि म्हणून गणेश उत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणणारी सामाजिक आणि सांस्कृतिक घटना आहे.आणि ह्याच धार्मिक उत्सवाला सामाजिक स्वरूप देण्याचे आदर्शवत कार्य साकारले गेले ते पनवेल तालुक्यातील रिटघर या आदर्श गावात ‘एक गाव एक गणपती’ ही परंपरा जोपासत पहिल्यांदा १९७५ मध्ये गावातील जाणकार मंडळींच्या माध्यमातून  ‘एक गाव एक गणपतीची’ संकल्पना मांडण्यात आली आणि त्या संकल्पनेला मूर्तरूप देत त्याच वर्षी गावातील मंदिरात गणपती बाप्पांना विराजमान करत गणेश उत्सव साजरा करायला सुरुवात करण्यात आली.यंदाचे उत्सवी वर्ष हे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरा होत आहे.

    गणपती उत्सवाचे महत्त्व लक्षात घेता आणि घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेश उत्सवाचे स्वरूप पाहता ‘एक गाव एक गणपती’ या उत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण गाव एकत्रित यावा, गावात एकोपा नांदावा म्हणून खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण गावातील आबालवृद्ध,महिला भगिनीं,युवावर्ग ,ग्रामस्थ मंडळी एकत्र येत आपले सर्व मतभेद बाजूला सारून अगदी गुण्यागोविंदाने ह्या उत्सवात सहभागी होत असतात.खास करून ह्या गावाने जपलेला हा एकात्मतेचा वारसा खऱ्या अर्थाने पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात आदर्शवत असाच आहे. सार्वजनिक गणेश उत्सवाच्या सोहळ्यात वारकरी सांप्रदायिक परंपरेच्या कार्यक्रमाअंतर्गत आरती, पारायण, प्रवचन, हरिपाठ, भजन, कीर्तन, जागर, काकडा, ज्ञानेश्वरी पारायण अशा पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

रिटघर गावात साजऱ्या होणाऱ्या या भक्तिमय उत्सवाला सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कला, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज मंडळीसोबतच शासकीय क्षेत्रातील, पोलीस विभागातील उच्चपदस्थ अधिकारी वर्ग दर वर्षी आवर्जून आपली उपस्थिती दर्शवित असतात, अशी माहिती रिटघर गावचे नवनिर्वाचीत सरपंच सुभाषशेठ भोपी यांनी दिली. 

ग्रामीण भागांत विशेषतः घरोघरी गणपती बसविण्याची प्रथा आहे. मात्र रिटघर गावाने सार्वजनिक गणेश उत्सवाच्या माध्यमातून ‘एक गाव एक गणपती’ ही परंपरा आजपर्यंत अविरतपणें सुरू ठेवत ‘सुवर्ण महोत्सवी वर्ष’ साजरे करत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. ज्याचे आज सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

Previous Post

नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागामार्फत ऐरोली विभागात तोडक कारवाई

Next Post

राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरविंदरसिंह व भाजपा विरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

Next Post
राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरविंदरसिंह व भाजपा विरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरविंदरसिंह व भाजपा विरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

‘शिवनेरीवर जाऊया, महाराजांचा स्पर्श अनुभवूया’ मनसेचे मोफत किल्ले दर्शन

‘शिवनेरीवर जाऊया, महाराजांचा स्पर्श अनुभवूया’ मनसेचे मोफत किल्ले दर्शन

एकविरा मातेचे दर्शन घेण्यासाठी शिवसेना उपनेते विजय नाहटा कार्यकर्त्यांसह कार्ले गावात दाखल

एकविरा मातेचे दर्शन घेण्यासाठी शिवसेना उपनेते विजय नाहटा कार्यकर्त्यांसह कार्ले गावात दाखल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com