• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 22, 2024

नवी मुंबईतील खासगीसह पालिका शाळेतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याची कॉंग्रेसची मागणी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : बदलापूरच्या धर्तीवर नवी मुंबईतील शाळांमध्ये मुलींबाबत कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी दिघा ते बेलापुरदरम्यानच्या महापालिका तसेच खासगी शाळांतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त व नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.

बदलापुरमध्ये शाळेच्या आवारातच शालेय कर्मचाऱ्याकडून दोघा अल्पवयीन चिमुरड्या बालिकांवर अत्याचार झाल्याचे व त्यातून बदलापुरवासियांचा उद्रेक झाल्याचे आपणास ठाऊक असेलच. अशा प्रकारची घटना नवी मुंबई शहरातील दिघा ते बेलापुरदरम्यानच्या खासगी व महापालिका शाळांमध्ये, शालेय परिसरामध्ये घडू नये यासाठी आपण येथील खासगी व महापालिका शाळांतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा युद्धपातळीवर घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच हे निवेदन सादर करत असल्याचे रविंद्र सावंत यांनी म्हटले आहे.

शालेय परिसरात सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही असणे आवश्यक आहे. लहान बालिकांसोबत तसेच बालकांसोबतही शालेय महिला कर्मचारी शौचालयात घेवून जाण्याकरीता असणे आवश्यक आहे. (बालिकांवरच नाही तर बालकांवरही लैगिंक अत्याचार घडल्याच्या घटना घडल्या आहेत.) तसेच शालेय बसमध्येदेखील महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे. नवी मुंबईतील शाळांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेताना शाळेमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही आहेत का? व ते सीसीटीव्ही चालू आहेत का? शाळेचा कानाकोपरा सीसीटीव्हीच्या कार्यक्षेत्रात आहे का? याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. शाळेत येणाऱ्या मुला-मुलींचा शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शिपाई, आया यांच्याशी जवळून संबंध येत आहे.  शाळेत असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचा, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा वर्तणूकीवर नजर ठेवताना प्रत्येकालाच ठराविक कालावधीनंतर वर्तणुकीबाबतचा पोलीसी अहवाल सादर करणे बंधनकारक करण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी निवेदनातून केली आहे.

शालेय आवारात, शाळेच्या वर्गामध्ये, शाळेच्या गच्चीवर, शौचालयामध्ये शालेय बालकांवर. बालिकांवर लैगिंक अत्याचार होण्याच्या घटना अलिकडच्या काळात राज्यामध्ये वाढीस लागल्या आहेत. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला त्या भूषणावह नाहीत. विद्यादानाच्या ठिकाणी व्याभिचार, अत्याचार, लैगिंक शोषण घडावे ही लज्जास्पद बाब आहे. अशा घटना घडल्यावर जनतेचा उद्रेक होतो. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. मुलींना शाळेत जाण्यास भीती निर्माण होते, अभ्यासावरचे मन उडते. शालेय जीवन उद्धवस्त होते. पूर्ण कुटूंबाचीच वाताहत होते. कृत्य करणारा नराधम काही वर्षांनी तुरूंगाबाहेर येतो. पण ज्यांनी भोगले आहे, ते मात्र मेल्याहून मेल्यासारखे जीवन जगत असतात. समस्येचे गांभीर्य आपण सर्वांनी वेळीच ओळखले पाहिजे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने व पोलिसांनी शाळेतील मुला-मुलींच्या सुरक्षेसाठी तसेच कामांध, वासनांध अपप्रवृत्तींना ठेचून काढण्यासाठी शालेय आवारातील व शाळा अंर्तगत भागातील सुरक्षाव्यवस्थेचा युद्धपातळीवर आढावा घेण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

मुंबई विद्यापिठ वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याची एमआयएमची मागणी

Next Post

जखमी गोविंदाला भाजपाकडून सव्वा लाखाची मदत

Next Post
जखमी गोविंदाला भाजपाकडून सव्वा लाखाची मदत

जखमी गोविंदाला भाजपाकडून सव्वा लाखाची मदत

नेरूळ, जुईनगरमधील उद्यानात वाढलेले जंगली गवत हटविण्याची काँग्रेसची मागणी

नेरूळ, जुईनगरमधील उद्यानात वाढलेले जंगली गवत हटविण्याची काँग्रेसची मागणी

नवी मुंबईतील स्वच्छताकर्मींनी घेतला स्वच्छताविषयक नाटयप्रयोगाचा विशेष अनुभव

नवी मुंबईतील स्वच्छताकर्मींनी घेतला स्वच्छताविषयक नाटयप्रयोगाचा विशेष अनुभव

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com