• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 28, 2024

महाविकास आघाडीची उरणमध्ये प्रचारात आघाडी

adminbyadmin
in रायगड
0
महाविकास आघाडीची उरणमध्ये प्रचारात आघाडी

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

पनवेल :   मावळ लोकसभेच्या मतदानाचे दिवस जसे जवळ येत आहे, तसा प्रचारामध्ये जोर चढत आहे. मावळमध्ये फॉर्म भरल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने प्रचारात उतरलेली दिसत आहे. कोणी उंटावर बसून प्रचार करतो, तर कोणी मोटरसायकल रॅली काढून प्रत्येक पक्षाने विविध प्रकारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. 

अशातच रविवारी उरणमध्ये वेगळे चित्र दिसले. महाविकास आघाडीने रविवारी उरण विभागामध्ये गाव पातळीवर मॅरेथॉन भेटीचे नियोजन करून मतदारांपर्यंत पत्रकाद्वारे संजोग भिकू वाघेरे पाटील यांचा प्रचार केला. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना नेते बबनदादा पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, कामगार नेते भूषण पाटील, काँग्रेस नेते महेंद्र शेठ घरत, शेकापचे माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील , राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सौ. भावना घाणेकर यांच्यासोबतच महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

जासई येथील हुतात्मा स्मारक आणि स्वर्गीय दि. बा. पाटील साहेबांना पुष्पहार घालून अभिवादन करून या दौऱ्याला सुरुवात झाली. यावेळी उपस्थित नागरिक आणि पदाधिकाऱ्यांना उमेदवाराची माहिती आणि उरणच्या विकासा संदर्भातील विविध विषयांवर मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रचारामध्ये तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी बोलताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले की, सर्वात जास्त मताधिक्य उरण मधून महाविकास आघाडीला मिळवून देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता सर्व जोर लावून प्रचारात महाविकास आघाडीतील इतर कार्यकर्त्यां सोबत आघाडीवर असेल. कामगार नेते महेंद्र घरत यांनी सांगितले की महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नियोजनबद्ध प्रचारामुळे पन्नास हजार पेक्षा जास्त मताधिक्य महाविकास आघाडीला उरण मधून मिळेल याची खात्री वाटते. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ही चांगली संधी आली आहे सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने प्रचार करून गद्दाराचा पराभव करूया असे आवाहन माजी आमदार मनोहर भोईर यांनी केले.

महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील विधानसभेची आकडेवारी पाहता नियोजनबद्ध प्रचाराची आखणी करून तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन महाविकास आघाडीने केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवून मावळ मतदार संघातील सर्वात जास्त मताधिक्य आम्ही उरणमध्ये केलेल्या विकासकामांच्या जोरावर  संजोग भिकू वाघेरे  पाटील यांना उरण विधानसभा मतदार संघातून मिळवून देणार असल्याचे पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.

 

Previous Post

चावडीवरील चर्चा निवडणुकीची

Next Post

भविष्यात हाक मारा ओ दिल्याशिवाय राहणार नाही : नारायण राणे

Next Post
भविष्यात हाक मारा ओ दिल्याशिवाय राहणार नाही : नारायण राणे

भविष्यात हाक मारा ओ दिल्याशिवाय राहणार नाही : नारायण राणे

मुख्यमंत्री महोदय, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्या : जयेश खांडगेपाटील

मुख्यमंत्री महोदय, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्या : जयेश खांडगेपाटील

विना भूसंपादन शेतातील अतिक्रमण हटवून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा: संदीप खांडगेपाटील

विनाभूसंपादन शेतीवर शासकीय अतिक्रमण झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरही त्याच्या परिवाराला न्याय देण्याची एमआयएमची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com