• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 26, 2024

कांदा बटाटा मार्केटची पुर्नबांधणी करा : हाजी शाहनवाझ खान

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील कांदा बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीचा लवकर निर्णय घेण्याची लेखी मागणी एमआयएमचे नवी मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीचे प्रभारी तसेच एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महासचिव हाजी शाहनवाझ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

नवी मुंबईतील तुर्भे येथे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या बाजार समितीमध्ये कांदा बटाटा, फळ , भाजी, किराणा दुकान, धान्य अशी पाच मार्केट आहे. या पाच मार्केटमध्ये कांदा बटाटा मार्केटची गेल्या दोन –अडीच दशकापासून धोकादायक अवस्था आहे. सिडकोने या मार्केटचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे केल्याने मार्केट सुरू होताच काही वर्षांमध्येच स्लॅप कोसळणे, लोखंडी सळ्या बाहेर येणे, तडे जाणे, वाळू गळणे अशा प्रकाराचा सामना मार्केटमधील बाजार समितीचे कर्मचारी, अधिकारी, व्यापारी, माथाडी, मापाडी, पालावाल, मेहता, खरेदीदार, शेतकरी यांना करावा लागला आहे. अडीच दशके मार्केट धोकादायक अवस्थेत असतानाही राज्य सरकार मार्केट पुनर्बांधणीबाबत काहीही करत नाही, ही शोकांतिका व संतापजनक बाब आहे.

या मार्केटमधील घटकांना आज जीव मुठीत ठेवून वावरावे लागत आहे. नवी मुंबई महापालिकेनेही मार्केट धोकादायक करून आज २० वर्षांचा कालावधी लोटला तरी मार्केटमध्ये व्यवहार होत आहेत. गाळ्यांची अवस्था धोकादायक आहे. अनेकदा दुर्घटनाही घडल्या आहेत. मोठी दुर्घटना झाल्यावर सरकार पुनर्बांधणीबाबत निर्णय घेणार आहे का?  मार्केटमध्ये पडझड झाल्यास बाजार समितीचे कर्मचारी, अधिकारी, व्यापारी, माथाडी, मापाडी, पालावाल, मेहता, खरेदीदार, शेतकरी यांच्या जिविताला धोका निर्माण होवू शकतो. समस्येचे गांभीर्य पाहता, ही दुर्घटना टाळण्यासाठी आपण संबंधितांना या मार्केटच्या पुनर्बांधणीबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत. या समस्येबाबत आपणास १० जानेवारी २०२४ रोजीही लेखी निवेदन दिले होते. आपणाकडून ते निवेदन “RAJESH KUMAR ACS (Coop & Mkt)” <acs.coop@maharashtra.gov.in>

यांना फॉरवर्ड करण्यात आले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून देण्यासाठी आपणास ६ फेब्रुवारी २०२४ रोजीही निवेदन सादर केले होते. आपण ते निवेदन  Anoop Kumar acs.agri@maharashtra.gov.in यांना फॉरवर्ड केले आहे.  निवेदने केवळ फॉरवर्ड केली जातात. कार्यवाही होत नाही. या समस्येवर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. समस्या गंभीर आहे. उद्या या धोकादायक मार्केटमध्ये पडझड होवून जिवितहानी झाल्यास त्यास जबाबदार कोण असणार? याचेही राज्य सरकारने आम्हाला उत्तर द्यावे अशी मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Previous Post

नागपुरात हायव्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा स्वत:च्या विद्यमान खासदाराचे तिकीट कापत शिवसेनेने दिले कॉंग्रेस आमदाराला तिकीट

Next Post

सानपाडा नोडमध्ये महापालिका आयुक्तांनी पाहणी अभियान राबवावे : पांडुरंग आमले

Next Post
प्रभाग ३० मधील सानपाडा व जुईनगर या विभागातील पावसाळी पूर्व कामांना सुरुवात करा : पांडुरंग आमले

सानपाडा नोडमध्ये महापालिका आयुक्तांनी पाहणी अभियान राबवावे : पांडुरंग आमले

इमारत पुनर्बांधणीसाठी जनजागृतीस्तव महापालिका मुख्यालय व विभाग अधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करा : हाजी शाहनवाझ खान

‘आयुक्त आपल्या दारी’ हे अभियान सुरु करण्याची एमआयएमची मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दाऊदी बोहरा समुदयाचे नेते सय्यदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन यांची सदिच्छा भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दाऊदी बोहरा समुदयाचे नेते सय्यदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन यांची सदिच्छा भेट

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com