• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 29, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दाऊदी बोहरा समुदयाचे नेते सय्यदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन यांची सदिच्छा भेट

adminbyadmin
in मुंबई
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दाऊदी बोहरा समुदयाचे नेते सय्यदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन यांची सदिच्छा भेट

सुवर्णा खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : रमजान या पवित्र महिन्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी संध्याकाळी दाऊदी बोहरा समाजाचे नेते सय्यदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन यांची सदिच्छा भेट घेतली. दक्षिण मुंबईतल्या मलबार हील येथील ‘सैफी महल’ या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सैय्यदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन यांच्यात विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.
सामजिक न्याय आणि सामाजिक सुधारणा, मुंबईचा विकास आणि मदरशांचे आधुनिकीकरण या विषयांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सैय्यदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन यांच्यात चर्चा झाली. राज्याचे समर्थपणे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या पावणे दोन वर्षात केलेल्या कामांचे सैय्यदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन यांनी कौतुक केले आणि त्यांना आशिर्वाद दिला.
मुख्यमंत्र्यांनी सैय्यदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन यांना सांगितले की, दाऊदी बोहरी समाज हा शांतताप्रिय आणि देशासाठी काम करणारा समाज आहे ही एक गर्वाची बाब आहे. दाऊदी बोहरी समाजाबद्दल सक्रिय, शांततापूर्ण आणि कायद्याचे पालन करणारे नागरिक म्हणून मानवतेच्या भल्यासाठी समर्पित असलेला समाज म्हणून दाऊदी बोहरा समुदयाने आपली ओळख निर्माण केली आहे. दाऊदी बोहरा मुस्लिम समुदायाची लोकसंख्या १० लाखांहून अधिक आहे. या समुदायाचे नेतृत्व त्यांचे नेते सैय्यदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन करत आहेत. मुंबईच्या जडणघडणीत दाऊदी बोहरा समाजाचे योगदान आहे. विशेषत: दक्षिण मुंबईत दाऊदी बोहरा नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. सैय्यदना अली कदर मुफद्दल सैफुद्दीन जगभरातील त्यांच्या अनुयायांना देशासाठी एक जबाबदार नागरिक बनण्यासाठी आणि शांती निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करत असतात. भारतात दाऊदी बोहरा समुदयाचे लोक प्रामुख्याने महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादमध्ये वास्तव्यास आहेत. त्याशिवाय गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, चेन्नई, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यात दाऊदी बोहरा समुदायाचे वास्तव्य आहे.

Previous Post

‘आयुक्त आपल्या दारी’ हे अभियान सुरु करण्याची एमआयएमची मागणी

Next Post

सानपाडा येथे महापालिका कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या निष्काळजपणामुळे १३ वर्षीय मुलाला वीजेच्या धक्क्यात मुलाने गमावली ३ बोटे

Next Post
सानपाडा येथे महापालिका कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या निष्काळजपणामुळे १३ वर्षीय मुलाला वीजेच्या धक्क्यात मुलाने गमावली ३ बोटे

सानपाडा येथे महापालिका कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या निष्काळजपणामुळे १३ वर्षीय मुलाला वीजेच्या धक्क्यात मुलाने गमावली ३ बोटे

अनधिकृत बॅनरवर कारवाई करुन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची एमआयएमची मागणी

उलवेवासियांच्या वीज समस्येचे निवारण करा : एमआयएमची मागणी

शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

महापालिका अधिकाऱ्यांची उपायुक्त पदावर नेमणूक करून त्यांना कार्यकारी विभाग देण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com