• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 28, 2023

इमारत पुनर्बांधणीसाठी जनजागृतीस्तव मदतीसाठी महापालिका मुख्यालय व विभाग अधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करा : हाजी शाहनवाझ खान

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात इमारत पुनर्बांधणीसाठी महापालिका प्रशासनाकडून जनजागृतीस्तव मदतीसाठी महापालिका मुख्यालय व विभाग अधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्याची लेखी मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकरांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई शहरातील इमारतींना मिळालेला वाढीव एफएसआय आणि इमारती जुन्या झाल्याने पुनर्बांधणीची गरज यामुळे शहरामध्ये टॉवरचे वारे गेल्या काही महिन्यापासून जोरदारपणे वाहत आहे. काही ठिकाणी टॉवर सुरू असून गेल्या पाच वर्षांत बांधकामही अत्यंत संथ गतीने सुरू आहे. काही ठिकाणी टॉवरचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरांनी करारात नमूद केल्याहून जागाही आता कमी देणार असल्याचे सांगत भाडेही कमी केले आहे. टॉवरच्या आमिषाने राहते घर सोडल्याने व गेली काही वर्षे संथ गतीने काम सुरू असल्याने रहीवाशांना तोडं दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे.
नवी मुंबईकर नागरिक हे या महापालिकेचे करदाते आहेत. महापालिकेचे उत्पन्न या करदात्यांवर अवलंबून आहे. टॉवर, एफएसआय, इमारतीची जागा किती, क्षेत्रफळ किती मिळू शकते, टॉवर किती मजली इमारतीचा होवू शकतो ही सर्व माहिती एकाद्या पीएमसीच्या धर्तीवर महापालिका प्रशासनाने नवी मुंबईकरांना देणे आवश्यक आहे. उद्या टॉवर झाल्यावर सदनिकांची संख्या वाढणार, क्षेत्रफळानुसार मालमत्ता करातही वाढ होणार. टॉवरच्या नावाखाली बिल्डरांनी रहीवाशांची फसवणूक केल्यास या शहराचीच प्रतिमा मलीन होणार आहे आणि लोक एकवेळ धोकादायक इमारतीत वास्तव्य करतील, परंतु टॉवरमध्ये जाण्याचे, बिल्डरला आपली राहती जागा सोडण्याचे धाडस दाखविणार नाहीत. या परिस्थितीत बदल करण्यासाठी व नागरिकांना सहकार्य करण्यासाठी महापालिका प्रशासनानेच आता पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे.
महापालिका मुख्यालयात व पालिका विभाग अधिकारी कार्यालयात टॉवर, पुनर्बांधणी यावर मार्गदर्शन तसेच सहकार्य करण्यासाठी स्वतंत्र दालन सुरू केल्यास नवी मुंबईकर आपल्या समस्या मांडतील, त्यांची फसवणूक होणार नाही. त्यांना मार्गदर्शन मिळाल्याने कोणीही बिल्डर अथवा बिल्डरांना मॅनेज झालेले सोसायटीचे पदाधिकारीही रहीवाशांची फसवणूक करणार नाहीत. पालिकेकडून मार्गदर्शन मिळाल्यास लोकांनाही आपल्याला कारपेट जागा किती मिळेल, साधारण बिल्टअप जागा किती असेल, आपल्या जागेत किती मजली टॉवर उभा राहू शकेल याबाबत माहिती प्राप्त होईल. उद्या पीएमसी नेमताना अथवा बिल्डरसोबत चर्चा करताना रहीवाशी त्या माहितीच्या आधारे टॉवरविषयक करारपत्र बनवू शकतील. टॉवरप्रकरणी राजकीय घटक, बिल्डर, नेमलेले पीएमसी, सोसायटीचे ठराविक पदाधिकारी यांच्याकडून रहीवाशांची संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी नवी मुंबई शहरात इमारत पुनर्बांधणीसाठी महापालिका प्रशासनाकडून जनजागृतीस्तव मदतीसाठी महापालिका मुख्यालय व विभाग अधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यासाठी आपण स्वत: पुढाकार घेवून संबंधितांना निर्देश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

ग्रामस्थांनी, प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करा : नामदेव भगत

Next Post

सिव्ह्यू नेरूळ या उद्यानातील बकालपणा नाहीसा करा : महादेव पवार

Next Post
सिव्ह्यू नेरूळ या उद्यानातील बकालपणा नाहीसा करा : महादेव पवार

सिव्ह्यू नेरूळ या उद्यानातील बकालपणा नाहीसा करा : महादेव पवार

सीवूडस  नेक्सस ग्रँड सेंट्रल मॉल मध्ये मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक

सीवूडस  नेक्सस ग्रँड सेंट्रल मॉल मध्ये मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक

शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

पालिका अधिकाऱ्यांतूनच नगर रचना विभागातील कार्यकारी अभियंता या पदाचा कार्यभार देण्याची इंटकची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com