• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 26, 2023

नवी मुंबई भाजपातर्फे संविधानदिन साजरा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई भाजपातर्फे संविधानदिन साजरा

 २६/११ हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली ,  ‘मन की बात’चे थेट प्रक्षेपण,  स्वच्छता मोहिमेचे आयोजन, ज्येष्ठांना एनएमएमटी मोफत प्रवास पासाचे वितरण, खेळाडूंचा सन्मान

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

स्वयंम पीआर एजंन्सी : ८३६९९२४६४६

 नवी मुंबई : नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली रविवारी नवी मुंबई भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले होते.  संविधान पंधरवडानिमित्त  संविधानदिन  साजरा करण्यात आला. स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूंचा  सत्कार करण्यात आला.  २६/११ मधील हल्ल्यात शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’  कार्यक्रमाच्या १०७ व्या  भागाचे प्रक्षेपण करण्यात आले.

 सीवूडस येथे  झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी भाजपा प्रदेश पदाधिकारी वर्षा भोसले, माजी नगरसेवक विशाल डोळस, माजी नगरसेवक विनोद म्हात्रे, माजी नगरसेवक गणेश म्हात्रे,  भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 संविधान पंधरवडानिमित्त नवी मुंबई भाजपाच्या वतीने बुथ स्तरावर  विविध कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात येते आहे. संविधानाचा अभ्यास भारतातील सर्व नागरिकांनी करायला हवा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष नाईक यांनी यावेळी केले. संविधानामध्ये  नमूद अधिकारांचा  वापर करताना कर्तव्यांचे देखील पालन करायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार २०१५ पासून देशात संविधान दिन  साजरा करण्यास सुरुवात झाली. हे संविधान तयार करण्यास अपार परिश्रम घेणारे घटना समितीचे प्रमुख भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  आणि घटना मसुदा समितीचे अन्य सदस्य यांच्या प्रती देश सदैव  कृतज्ञ राहील.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १०७व्या  मन की बात भागाचे प्रक्षेपण  करण्यात आले. जिल्हाध्यक्ष नाईक आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी  ज्येष्ठ नागरिकांसमवेत  हे प्रक्षेपण पाहिले. पंतप्रधान मोदी यांनी देशामध्ये सुरू केलेली स्वच्छतेची चळवळ देशात आमुलाग्र बदल   घडवत  आहे. वोकल लोकल फोर लोकल चळवळीमुळे स्वदेशी उत्पादनांना मागणी वाढल्याचे  जिल्हाध्यक्ष नाईक म्हणाले.

लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी केलेल्या मागणीनुसार नवी मुंबई शहरातील ६५ वर्षांवरील  ज्येष्ठ नागरिकांना  एनएमएमटीच्या मोफत बस  प्रवासाची  सुविधा सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी याबद्दल लोकनेते आमदार नाईक यांचे आभार मानले. तर अन्य शहरांच्या तुलनेत नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत असल्याचे प्रतिपादन  जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी केले.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी अतिरेक्यांनी मुंबईवर केलेल्या  भ्याड हल्ल्यामध्ये  शहीद झालेले  पोलीस  अधिकारी-कर्मचारी, सैनिक आणि नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

 स्वच्छता मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. स्वच्छतेसाठी  अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पारितोषिके नवी मुंबई शहराला मिळालेली आहेत.  स्वच्छता ही  एक दिवस करण्याची गोष्ट नसून वर्षाचे ३६५ दिवस आणि २४ तास  स्वच्छता करायला हवी, असे मत जिल्हाध्यक्ष नाईक यांनी यावेळी मांडले.

 या कार्यक्रम प्रसंगी कराटे आणि आर्चरीमधील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील  खेळाडूंचा जिल्हाध्यक्ष नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नवी मुंबईमध्ये या दोन खेळांसाठी  पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी या खेळाडूंनी केली असता  त्या अनुषंगाने प्रयत्न करण्याची ग्वाही जिल्हाध्यक्ष नाईक यांनी दिली.

 सीवूड सेक्टर ४८  येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक तयार करण्याबाबतची मागणी  जिल्हाध्यक्ष नाईक यांच्याकडे  यावेळी करण्यात आली त्यावर  सिडकोच्या माध्यमातून हा विषय सोडवू असे आश्वासन त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना दिले.

 माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली  सर्व कार्यक्रम  राबविल्याची प्रतिक्रिया दिली.

Previous Post

महेंद्रशेठ घरत यांनी तेलंगणा मधे केला मोहम्मद अझरूद्दीन  यांचा प्रचार !

Next Post

सारसोळे गावाची वाटचाल ‘स्मार्ट’  व्हिलेजच्या दिशेने

Next Post
सारसोळे गावाची वाटचाल ‘स्मार्ट’  व्हिलेजच्या दिशेने

सारसोळे गावाची वाटचाल ‘स्मार्ट’  व्हिलेजच्या दिशेने

सानपाडा व जुईनगरमध्ये आरोग्य शिबिरांसह जनजागृती शिबिरांचे आयोजन करा : पांडुरग आमले

गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागात धुरीकरण करा : पांडुरंग आमले

वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा नियत्रंण मिळेपर्यत बांधकामांवर बंदी आणा : नामदेव भगत

ग्रामस्थांनी, प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करा : नामदेव भगत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com