• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 13, 2023

लोकनेते आ. गणेश नाईक यांची आदिवासी बांधवांसोबत दिवाळी उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
लोकनेते आ. गणेश नाईक यांची आदिवासी बांधवांसोबत दिवाळी उत्साहात

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : दिवाळीचा आनंद प्रत्येकजण आपल्यापरीने साजरा करीत असतो. प्रकाशाच्या या उत्सवाला सामाजिक बांधिलकीचे कोंदण देत खैरणे येथील कातकरी पाड्यावर आदिवासी बांधवांसोबत आज लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली.

लोकनेते आमदार नाईक यांच्या समवेत माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, युवा नेते संकल्प नाईक, स्थानिक माजी नगरसेवक शशिकांत भोईर, माजी नगरसेवक चंद्रकांत डोळे, नगरसेवक चंद्रकांत पाटील व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

कातकरी पाड्यातील बांधवांना साड्या आणि कपडे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पुस्तकांबरोबर मिठाईचे वाटप करून या सर्वांची दिवाळी गोड करण्यात आली. यावेळी कातकरी पाडा येथील आदिवासी बांधवांचे आणि मुलांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते.  नवी मुंबईमध्ये दिघ्यापासून बेलापूरपर्यंत विविध ठिकाणी आदिवासी पाडे आहेत यामधून वारली, कातकरी इत्यादी जमातीचे आदिवासी बांधव वर्षानुवर्ष राहत आहेत. निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी आजही आपली संस्कृती टिकवून ठेवली आहे. लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी आजतागायत नवी मुंबईमध्ये आदिवासी समाजाच्या कल्याणाच्या योजना राबवून या समाजाचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केलेला आहे. महापालिकेच्या माध्यमातून आदिवासींसाठी मोफत घरकुल योजना राबविण्यात आली. कुडाच्या खोल्यांमधून आदिवासी बांधव पक्या घरांमध्ये राहण्यास गेले. त्यांचे जीवनमान उंचावले. या समाजासाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. आदिवासी पाड्यांमध्ये शाळा, समाज मंदिरे, आरोग्य केंद्रे अशा आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जेणेकरून या समाजाच्या मनातील दुर्लक्षित झाल्याची भावना नाहीशी होऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. आदिवासी समाजातील मुले देखील शिक्षण घेऊन नावलौकिक कमावतील, प्रशासकीय यंत्रणेमध्ये मोठ्या हुद्द्यावर जातील अशा शुभेच्छा लोकनेते नाईक यांनी यावेळी दिल्या. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ सबका विकास’ या धोरणानुसार कार्यरत असल्याचे सांगितले.

 

Previous Post

डास नियत्रंणासाठी गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात धुरीकरण करा : विद्या भांडेकर

Next Post

मोफत एनएमएमटी प्रवास सुविधेसाठी ज्येष्ठांनी मानले लोकनेते गणेश नाईक यांचे आभार

Next Post
मोफत एनएमएमटी प्रवास सुविधेसाठी ज्येष्ठांनी मानले लोकनेते गणेश नाईक यांचे आभार

मोफत एनएमएमटी प्रवास सुविधेसाठी ज्येष्ठांनी मानले लोकनेते गणेश नाईक यांचे आभार

शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

परिवहन सेवेत महिलांना ५० टक्के तिकिट दर आकारणीसाठी कॉंग्रेस आग्रही

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नातून तुलसी भवन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मिळणार प्रत्येकी  ५ लाख रूपयांची मदत

बेलापूर मतदारसंघामध्ये चौकाचौकात लागणार महिलांच्या सरंक्षणाकरिता सोलर हायमास्ट :  आ. मंदाताई म्हात्रे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com