• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 13, 2023

परिवहन सेवेत महिलांना ५० टक्के तिकिट दर आकारणीसाठी कॉंग्रेस आग्रही

adminbyadmin
in नवी मुंबई
0
शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :  : महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून (एनएमएमएटी) प्रवास करणाऱ्या नवी मुंबईकर महिलांना तिकिट दरात ५० टक्के सवलत देण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि महापालिका परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापकांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

शासनाच्या परिवहन सेवेमधून प्रवास करणाऱ्या महिलांना केवळ ५० टक्केच तिकिट राज्याचे एसटी महामंडळाकडून आकारले जात आहे. त्याच धर्तीवर नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमानेही महिलांच्या सन्मानार्थ प्रवासी सेवेत ५० टक्के सवलतीच्या दरात तिकिट आकारणी करणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासन नवी मुंबईतील महिलांसाठी विविध जनकल्याणकारी योजना राबवित आहे. त्यामुळे हाही महिला हितैषी निर्णय महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर घेणे आवश्यक असल्याचे रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.

नवी मुंबई महापालिका प्रशासनाने आजपासूनच नवी मुंबईकर ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासी सुविधा एनएमएमटीच्या बसेसमधून सुरू केलेली आहे. नवी मुंबईकर महिलांना प्रवासी सुविधा देण्यासोबत एनएमएमटीने आपल्या बसेसमधून प्रवास करताना महापालिका प्रशासनाने ५० टक्के सवलत देणे आवश्यक आहे. नोकरदार महिलांसोबत घरगुती महिलांना या निर्णयाने दिलासा मिळेल. घरगुती महिलांना या निर्णयामुळे कमी खर्चात प्रवास करणे शक्य होईल. एसटी महामंडळाने महिलांना यापूर्वीच महिलांना प्रवासामध्ये ५० टक्के सवलत दिलेली आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासात महिला प्रवाशांची संख्या वाढीस लागली आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. आपण लवकरात लवकर महापालिका परिवहन सेवेच्या (एनएमएमटी) बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिट दरात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेवून संबंधितांना निर्देश देण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि महापालिका परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापकांकडे केली आहे.

Previous Post

मोफत एनएमएमटी प्रवास सुविधेसाठी ज्येष्ठांनी मानले लोकनेते गणेश नाईक यांचे आभार

Next Post

बेलापूर मतदारसंघामध्ये चौकाचौकात लागणार महिलांच्या सरंक्षणाकरिता सोलर हायमास्ट :  आ. मंदाताई म्हात्रे

Next Post
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नातून तुलसी भवन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मिळणार प्रत्येकी  ५ लाख रूपयांची मदत

बेलापूर मतदारसंघामध्ये चौकाचौकात लागणार महिलांच्या सरंक्षणाकरिता सोलर हायमास्ट :  आ. मंदाताई म्हात्रे

शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

परिवहनमधील कर्मचारी-अधिकाऱ्यांना कोव्हिड भत्ता देण्याची नवी मुंबई इंटकची मागणी

महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयातून येणारी दुर्गंधी थांबवा : संदीप खांडगेपाटील

महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयातून येणारी दुर्गंधी थांबवा : संदीप खांडगेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com