• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 18, 2023

कायम, ठोक, कंत्राटी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या समस्या सोडवा : रविंद्र सावंत

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
कायम, ठोक, कंत्राटी कर्मचारी अधिकाऱ्यांच्या समस्या सोडवा : रविंद्र सावंत

नवी मुंबई : महापालिका प्रशासनाच्या आस्थापनेतील कायम, ठोक तसेच कंत्राटी संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे. मंगळवारी महापालिका मुख्यालयात कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून कर्मचारी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी कामगार नेते रविंद्र सावंत यांच्यासह शिष्टमंडळातील सहभागी कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्या आयुक्तांसमोर विस्तृतपणे मांडल्या.

दिवाळीच्या  पार्श्वभूमीवर महापालिका आस्थापनेतील कायम, ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर करण्याच्या मुद्यावर बोलताना कामगार नेते रविंद्र सावंत बैठकीत म्हणाले की, दिवाळी आता जेमतेम सव्वा महिन्यावर आली आहे. दिवाळी म्हटल्यावर शासकीय अथवा खासगी आस्थापनेतील कर्मचारी तसेच अधिकारी बोनसची आतुरतेने वाट पाहत असतात. वाढत्या महागाईत घरातील दिवाळीचा फराळ, मुलांसाठी कपडे, फटाके व अन्य खरेदी अशा अनेक कारणासाठी बोनस हा त्यांच्या अर्थकारणाला हातभार लावत असतो. महापालिका प्रशासनाला कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे सातत्याने केंद्र व राज्य स्तरावर सातत्याने पुरस्कार मिळत आहे. महापालिकेचा व शहराचा नावलौकीक वाढत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या कायम कर्मचाऱ्यांना ३५ हजार रुपये सानुग्रह अनुदान आणि ठोक मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३० हजार रुपये सानुग्रह अनुदान महापालिका प्रशासनाने लवकर जाहीर करून या कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, असे रविंद्र सावंत यावेळी म्हणाले.

पालिका परिवहन कर्मचाऱ्यांच्या मुद्यावर बोलताना कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका परिवहन उपक्रमातील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहिर करण्याची मागणी केली. महापालिका परिवहन उपक्रमातील अधिकारी, कर्मचारी तसेच ठोक मानधनावरील वाहक, चालक तसेच इतर कर्मचारी नवी मुंबईकरांना सर्वोत्तम दर्जांची सेवा देण्यासाठी करत असलेले परिश्रम खरोखरीच प्रशंसनीय असून ही बाब कोणालाही नाकारता येणार नाही. कोरोना काळात परिवहनची सेवा तसेच परिवहन बसच्या माध्यमातून रूग्णालयीन सेवा, कोरोना रूग्णांनी ने-आण, प्रवासी सुविधा याची आजही नवी मुंबईकरांमध्ये चर्चा आहे.  दिवाळी आता जेमतेम सव्वा महिन्यावर आली आहे. दिवाळी म्हटल्यावर शासकीय अथवा खासगी आस्थापनेतील कर्मचारी तसेच अधिकारी बोनसची आतुरतेने वाट पाहत असतात. वाढत्या महागाईत घरातील दिवाळीचा फराळ, मुलांसाठी कपडे, फटाके व अन्य खरेदी अशा अनेक कारणासाठी बोनस हा त्यांच्या अर्थकारणाला हातभार लावत असतो. महापालिका प्रशासनाला कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे सातत्याने केंद्र व राज्य स्तरावर सातत्याने पुरस्कार मिळत आहे. महापालिकेचा व शहराचा नावलौकीक वाढत आहे. परिवहन उपक्रमातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना किमान ३५ हजार रूपये व ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना किमान ३० हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी यावेळी केली.

कामगार समस्यांबाबत बोलताना बैठकीत कामगार नेते रविंद्र सावंत म्हणाले की, पालिका आस्थापनेतील विविध संवर्गातील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी तसेच परिवहन उपक्रमातील वाहक, चालक आणि शिक्षण विभागातील शिक्षकांच्या वेतनवाढीसाठी आम्ही ऑगस्ट क्रांतीदिनी ९ ऑगस्ट २०२३ रोजी महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषणासही बसलो होतो. आपण या समस्या ३१ ऑगस्टच्या आत सोडविण्याचे आश्वासन दिल्यामुळे आपल्या शब्दाखातर आम्ही आमचे उपोषणही स्थगित केले होते. आपल्या आश्वासनाला आता दोन महिन्याहून अधिक कालावधी लोटला असला तरी आपणाकडून समस्या निवारणासाठी तसेच वेतनवाढीसाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही सुरू झाली नसल्याचा खेद वाटत असल्याचे सावंत यावेळी म्हणाले.

ठोक मानधनावरील एका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ करताना त्यांचे वेतन ३५ हजार रुपये करण्यात आले आहे. तर दुसरीकडे शिक्षणासारख्या क्षेत्रात शिकविण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना अवघ्या १ ते २ हजार रूपयांची तुटपुंजी वेतनवाढ करून त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात आले आहे. शिक्षकांची झालेली तुटपुंजी वेतनवाढ आम्हाला अमान्य असून अन्यायकारक आहे. याशिवाय अन्य सर्वच आस्थापनेतील ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसाठी व समस्या निवारणासाठी आपणाकडून कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीस सुरूवात न झाल्याने ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या कर्मचाऱ्यांना आधीच वेतन कमी असून त्यात महापालिका प्रशासनाने त्यांना आजतागायत कोणत्याही प्रकारची मेडीक्लेमची सुविधा देण्यात आलेली नाही. त्यांना लवकरात लवकर प्रशासनाच्या वतीने मेडिक्लेमची सुविधा मिळणे आवश्यक आहे. परिवहन उपक्रमातील ठोक मानधनावरील चालक व वाहक तसेच अन्य कर्मचाऱ्यांनाही आज कमी वेतनावर काम करावे लागत आहे. कोरोना काळात परिवहनची सेवा तसेच परिवहन बसच्या माध्यमातून रूग्णालयीन सेवा, कोरोना रूग्णांनी ने-आण, प्रवासी सुविधा याची आजही नवी मुंबईकरांमध्ये चर्चा आहे. त्यांच्या वेतनाबाबत आजवर केवळ प्रशासनाकडून , परिवहन उपक्रमाकडून आश्वासन दिले जात आहे. कार्यवाही होत नाही. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला जात नाही, ही दुर्देवाची बाब आहे. आपण याही कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत व समस्या सोडविण्याबाबत संबंधितांना निर्देश देवून त्यांची आजवर होत असलेली ससेहोलपट संपुष्ठात आणावी, अशी मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी यावेळी केली.

या बैठकीत शिष्टमंडळात सहभागी झालेल्या रोहन कोकाटे यांनी अग्निशमन विभागाच्या समस्या मांडल्या. श्रीमती सुनिता अपाले यांनी महापालिकेतील परिचारिकांच्या समस्या मांडल्या.परिचारिकांना गेल्या १० ते २० वर्षात आश्वासित योजनेचा लाभ भेटला नसल्याचे अपाले यांनी पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. शिक्षकांची तुटपुंजी वेतनवाढ, ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांचे अपुरे वेतन, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या, दिवाळी बोनस, परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या समस्या या सर्वांचा उहापोह आयुक्तांसमोर झालेल्या चर्चेदरम्यान करण्यात आला. पालिका आयुक्तांनी लवकरात लवकर या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन कामगार नेते रविंद्र सावंत आणि शिष्टमंडळातील कर्मचाऱ्यांना दिले.

Previous Post

जुईनगर सेक्टर २३ मधील पाण्याची समस्या सोडवा : विद्याताई भांडेकर

Next Post

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील-प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

Next Post
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील-प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील-प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

प्रत्येक सेक्टरमध्ये कॉंग्रेसचे कार्यालय उघडणार : रविंद्र सावंत

प्रत्येक सेक्टरमध्ये कॉंग्रेसचे कार्यालय उघडणार : रविंद्र सावंत

आयुक्त महोदय, नेरूळ सेक्टर सहाच्या वाहतुक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढा : संदीप खांडगेपाटील

नेरूळ सेक्टर सहासह सारसोळे गावची पाण्याची समस्या सोडवा : संदीप खांडगेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com