• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 2, 2023

लक्षवेधी व आकर्षक गोवर्धनी माता मंदिर प्रवेशव्दाराचा भव्यतम शुभारंभ

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
लक्षवेधी व आकर्षक गोवर्धनी माता मंदिर प्रवेशव्दाराचा भव्यतम शुभारंभ

गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : नवी मुंबईला ऐतिहासिक परंपरा असून यामध्ये मूळच्या बेलापूर पट्टीचे श्रध्दास्थान असलेली आणि बेलापूर गाव व परिसरातील अनेकांची कुलदेवता असलेली आई गोवर्धनी माता मंदिरात नवरात्रौत्सव व अनेक कार्यक्रम आयोजन करण्याचे भाग्य मला मिळत असल्याचे सांगत बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे यांनी  मंदिराकडे जाताना भाविकांच्या मनात भक्तीभाव उत्पन्न करणारे व देवदेवतांच्या आकर्षक मूर्ती असलेले भव्यतम प्रवेशव्दार आपल्या संकल्पनेतून अत्यंत उत्तम रितीने साकारण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरील किल्ले गावठाण येथील गोवर्धनी माता मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर पामबिच नजीक उभारण्यात आलेल्या आकर्षक आई गोवर्धनी माता मंदिर प्रवेशव्दाराचे उद्घाटन नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, शहर अभियंता संजय देसाई, उपआयुक्त सोमनाथ पोटरे व डॉ. बाबासाहेब राजळे, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, सहा. आयुक्त शशीकांत तांडेल, माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, रामचंद्र घरत, अशोक गुरखे,  नेत्रा शिर्के, दिपक पवार, सुनिल पाटील, भरत जाधव,   निलेश म्हात्रे व गोवर्धनी माता मंदिर ट्रस्टचे विश्वस्त ॲड. विनोद सोनटक्के, डॉ. राजेश पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबईच्या नावलौकिकाला साजेशा व चिमाजी अप्पांपासूनच्या ३०० हून अधिक वर्षांच्या इतिहासाला उजाळा देणा-या आई गोवर्धनी माता मंदिर प्रवेशव्दाराचा शुभारंभ करण्याचा योग आज लाभला हा आपल्यासाठी आनंदाचा क्षण असून इतर प्रवेशव्दारांपेक्षा हे अत्यंत आगळेवेगळे व अतिशय मोक्याच्या ठिकाणी असणारे प्रवेशव्दार देवदेवतांच्या लक्षवेधी मूर्तींमुळे पाहता क्षणी मनात भक्तीभाव निर्माण करते अशा शब्दात महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आपल्या कार्यालयाच्या दालनातून दिसणाऱ्या या प्रवेशद्वारामुळे देवतांचे नियमित दर्शन होईल. तसेच ऊर्जास्थान असणाऱ्या गोवर्धनी मातेची नजरही आपल्यावर राहील असे आयुक्त म्हणाले.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने २९ गावांची ओळख जतन होण्याकरिता ठिकठिकाणी प्रवेशव्दारांची निर्मिती करण्यात येत असून आ. मंदा म्हात्रे यांच्या संकल्पनेतून गोवर्धनी माता मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर हे दाक्षिणात्य शैलीचे मंदिराला अनुरुप असे अतिशय सुंदर प्रवेशव्दार उभारण्यात आले आहे. मदुराई येथील शिल्पचित्रकारांनी या प्रवेशव्दार निर्मितीमध्ये कला योगदान दिले आहे. या प्रवेशरामुळे गोवर्धनी माता मंदिर याठिकाणी आहे हे सहजपणे कळेल व भाविकांना शोधत बसावे लागणार नाही याचाही उल्लेख आमदार मंदा म्हात्रे यांनी केला.

नवी मुंबईचा क्विन नेकलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पामबीच मार्गानजिक महापालिका मुख्यालयाच्या आयकॉनिक वास्तूसमोर राम, लक्ष्मण, सिता, हनुमान, शंकर, पार्वती, गणेश, विष्णू, श्रीकृष्ण, गरुड, हत्ती, शंख, चक्र अशा देवदेवतांच्या व प्रतिक चिन्हांच्या मूर्ती असलेले हे भव्यतम व आकर्षक प्रवेशद्वार पाहता क्षणी लक्ष वेधून घेते. रस्त्यापासून ६ मीटर उंच व १२.५ मीटर लांब असणाऱ्या या प्रवेशद्वारामुळे या परिसराच्या सौंदर्यातही लक्षणीय भर पडलेली आहे.

Previous Post

दिघा गाव स्थानक नावावर राज्य सरकारचे शिक्कामोर्तब

Next Post

प्रभाग ३४ मधील साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी धुरीकरण अभियान राबवा : सुजाता सुरज पाटील

Next Post
प्रभाग ३४ मधील साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी धुरीकरण अभियान राबवा : सुजाता सुरज पाटील

प्रभाग ३४ मधील साथीचे आजार नियत्रंणात आणण्यासाठी धुरीकरण अभियान राबवा : सुजाता सुरज पाटील

तुलसी विहार दुर्घटनेतील मयतांच्या परिवारांना मदत करण्यास सरकार उदासिन

तुलसी विहार दुर्घटनेतील मयतांच्या परिवारांना मदत करण्यास सरकार उदासिन

काँग्रेसची वॉर रुम भाजपाच्या फेक न्यूजला सडेतोड उत्तर देणार

काँग्रेसची वॉर रुम भाजपाच्या फेक न्यूजला सडेतोड उत्तर देणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com