• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 27, 2023

नेरूळ सेक्टर सहा व चारमधील चौकातील वाहतुक कोंडीवर तोडगा काढा

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मुख्यमंत्री महोदय, मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांच्या वेतनाची दिनांक निश्चित करा : संदीप खांडगेपाटील

संदीप खांडगेपाटील यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साकडे

गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :  नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर सहा व चार मधील चौकात होणाऱ्या वाहतुक कोंडीवर तातडीने तोडगा काढण्यासाठी नवी मुंबई महापालिका व स्थानिक वाहतुक पोलिसांना आदेश देण्याची लेखी मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

या समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून देण्यासाठी आपणास हे निवेदन सादर करत आहोत. परंतु निवेदनातून आपणास गांभीर्याची तीव्रता समजणार नाही. आपण सांयकाळपासून ते रात्री उशिरापर्यत तसेच दुपारच्या वेळीही तिथे थांबून राहील्यास समस्येचे गांभीर्य आपल्या निदर्शनास येईल आणि अनुभवयासही मिळेल, असे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

नेरूळ सेक्टर सहा व चारच्या मध्ये चौक आहे. या चौकात वाहनांची वर्दळ  नेहमीच असते. सेक्टर सहामधील व सेक्टर चारमधील  वाहने पामबीच मार्गाकडे जाण्यासाठी अथवा राजीव गांधी उड्डाण पुलाकडे जाण्यासाठी याच चौकात येतात. या चौकापासून हाकेच्याच अंतरावर असलेल्या पामबीच मार्गाकडून नेरूळमध्ये येणारी वाहने सेक्टर २,४,६, १६, १८, २०, २४ सेक्टरकडे जाण्यासाठी या चौकातूनच ये-जा करतात. या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यापासून वाहतुक कोंडीची समस्या होती. परंतु आता या समस्येचा भस्मासूर झालेला आहे. या चौकातून वाहने बाहेर काढण्यासाठी २० ते ३५ मिनिटे लागतात. यादरम्यान कोणी रूग्णवाहिकेत सिरीयस असलेला रूग्ण उपचाराअभावी दगावण्याची भीती आहे. कोठे दुर्घटना घडल्यास अग्निशमनच्या वाहनांना घटनास्थळी लवकर जाता येत नसल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

या चौकालगतच मोठमोठी हॉटेल, टायर विक्रीची दुकाने आहेत. हॉटेलचालकांनी, टायर दुकानवाल्यांनी मार्जिनल स्पेसवर पूर्णपणे अतिक्रमण केल्याने हॉटेलमध्ये येणाऱ्यांची वाहने रस्त्यावर कोठेही उभी असतात. नो पार्किंगचे फलक नामधारी झाले असून फलकासमोरच वाहने उभी असतात. या हॉटेलांच्या विरूध्द दिशेलाच वाहतुक पोलीस असतानाही या वाहनांवर कारवाई केली जात नाही. टायरविक्रेत्यांने मार्जिनल स्पेसमध्ये टायर बदलण्यासाठी आलेली वाहने उभी केल्यास तेथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना रस्त्यावरून ये-जा करावी लागते. त्यातून पादचारी व वाहनचालकांची दररोज भांडणे होवून गर्दी जमा होवून वाहतुक कोंडी वाढत असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

या ठिकाणच्या वाहतुक कोंडीवर महापालिका व वाहतुक पोलिसांनी सातत्याने कारवाई करून तोडगा काढणे आवश्यक आहे. या चौकालगत हॉर्टचे हॉस्पिटल आहे. वाहनांची गर्दी झाल्यावर हॉर्नच्या सतत आवाजामुळे रूग्णही त्रस्त झाले आहेत. येथील मार्जिनल स्पेसवर विळखा घालणारे टायरविक्रेते, हॉटेलचालक यांच्यावर दररोज महापालिकेने कारवाई केल्यास पादचाऱ्यांना ये-जा करण्यास कोणताही अडथळा येणार नाही. रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर टोईग लावून वाहतूक पोलिसांनी सतत कारवाई केल्यास दंडामुळे येथे कोणी वाहने उभी करणार नाही. वाहतुक कोंडीची समस्या निकाली निघेल. या चौकातील वाहतुक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासन व वाहतुक पोलिसांनी संयुक्तपणे सातत्याने कारवाई करावी. समस्येमुळे वाहनचालक व पादचारी तसेच सभोवतालच्या इमारतीमधील रहीवाशी त्रस्त झाले आहेत. हॉर्नचा आवाज व धुराचा त्रास स्थानिकांना नाहक सहन करावा लागत आहे. आपण या समस्येचे कायमस्वरूपी निवारण करण्यासाठी संबंधितांना आदेश देवून वाहनचालकांना, पादचाऱ्यांना आणि स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून केली आहे.

Previous Post

पालिका कंत्राटी वाहनचालकांनी स्विकारले महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे सदस्यत्व

Next Post

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबई शहरात बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहिम राबविण्याची एमआयएमची मागणी

नवी मुंबई शहरातील शाळांमध्ये शिक्षकांना मिळत असलेल्या अत्यल्प वेतनाची चौकशी करा : हाजी शाहनवाझ खान

सफाई कामगारांसमवेत कॉंग्रेसचा रक्षा बंधन उत्साहात

सफाई कामगारांसमवेत कॉंग्रेसचा रक्षा बंधन उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com