• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 18, 2023

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन

सानपाडा प्रभाग क्र. ३० या विभागातील केमिस्ट भवन कार्यक्रम

गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांच्या वतीने १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रातील १८ ऑगस्ट २०२३ रोजी सानपाडा प्रभाग क्र. ३० या विभागातील केमिस्ट भवन येथे नवीन मतदार नोंदणी अभियान कार्यक्रम आयोजन केले होते. यावेळी आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, भारतात निवडणुकांचा बिगुल कधी पण वाजू शकतो, याच अनुषंगाने विद्यार्थी व विद्यार्थिनींचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे अशा तरुण युवक व युवतीने आपला मतदानाचा हक्क बजवावा म्हणून गुरूवारी भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांच्या वतीने सानपाडा येथील केमिस्ट भवनमध्ये नवीन मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

या अभियानात मोठ्या संख्येने तरुण-तरुणी तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच ज्या नागरिकांना मतदानाचा अधिकार असून सुद्धा त्यांच्याकडे मतदान कार्ड नाही अशा नागरिकांना मतदानापासून वंचित राहू नये याकरिता त्यांचेही नाव नोंदणी केली जाणार आहे. तसेच मतदानाच्या कार्डामध्ये काही त्रुटी असतील त्याही सोडविण्याचे काम या अभियांद्वारे झाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, कुठल्याही नागरिकाचा मतदानाचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आपल्या देशात लोकशाही संपूर्ण जगात भक्कम व यशस्वी असल्याचे भारत निवडणूक आयोगाने सर्व जगाला दाखवून दिलेले आहे. देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणसाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे म्हणून आज या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुण-तरुणी तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहून नवीन मतदार नोंदणी करून घेतली.

यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेवक भरत जाधव, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष मारुती कदम, सुभाष बारवाल, विठ्ठल गव्हाणे, आनंद गावडे, नाना शिंदे, श्रीपाद पत्की, कुलवडे, देवेंद्र कोराले, विश्वास कणसे, ज्ञानेश्वर डोके व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

परिवहनच्या जखमी  वाहकाला महाराष्ट्र कर्मचारी युनियनची मदत

Next Post

नवी मुंबईकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी सुरज पाटील आक्रमक

Next Post
नवी मुंबईकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी सुरज पाटील आक्रमक

नवी मुंबईकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी सुरज पाटील आक्रमक

कॉंग्रेसच्या सफाई अभियानामुळे स्वच्छ क्रिडांगणावर मुले खेळायला परतली

कॉंग्रेसच्या सफाई अभियानामुळे स्वच्छ क्रिडांगणावर मुले खेळायला परतली

सानपाडा व जुईनगरमध्ये आरोग्य शिबिरांसह जनजागृती शिबिरांचे आयोजन करा : पांडुरग आमले

सानपाड्याचे नागरिक कर भरत नाही काय? – पांडुरंग आमले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com