• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 21, 2023

दुर्घटना घडल्यावर महापालिका कार्यवाही करणार का? पांडुरंग आमले

adminbyadmin
in नवी मुंबई
0
दुर्घटना घडल्यावर महापालिका कार्यवाही करणार का? पांडुरंग आमले

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई :  सानपाडा सेक्टर २ मधील नादुरूस्त व बंद अवस्थेत असलेल्या पथदिव्यांची तात्काळ दुरूस्ती करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची पालिका आयुक्तांकडे सातत्याने लेखी मागणी करूनही व आयुक्तांनी कारवाईसाठी फॉरवर्ड करूनही जनतेला अंधारातच ये-जा करावी लागत आहे. महिलेचा विनयभंग, मुलींची छेडछाड अथवा त्याहून भयानक घटना घडल्यावर नवी मुंबई महापालिका प्रशासन समस्या निवारणासाठी कारवाई करणार का? असा संतप्त सवाल भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना विचारला आहे.

सानपाडा सेक्टर २ मध्ये पथदिवे बंद असल्याने अंधारातच रहीवाशांना ये-जा करावी लागते. महिला व मुलींच्या बाबतीत पावसामध्ये अंधाराचा गैरफायदा घेवून अनुचित प्रकार घडण्याची भीती असल्याने पांडुरंग आमले यांनी १२ जुलै आणि १७ जुलै पालिका आयुक्तांना निवेदन देवून समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून देताना समस्येचे तात्काळ निवारण करण्याचे निर्देश दिले. परंतु कार्यवाहीच झाली नसल्याने व अजूनही अंधारच असल्याने आयुक्तांच्या आदेशाला प्रशासन केराची टोपली दाखवते असा याचा यातून अर्थ काढायचा का? असा संतप्त प्रश्न पांडुरंग आमले यांनी विचारला आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पथदिवे, रस्त्यावरील खड्डे, पदपथ व अन्य कामांबाबत आपण सानपाडा-जुईनगर नोडमध्ये पाहणी अभियान राबवून कामांची पाहणी करावी यासाठी आम्ही आपणाकडे  यापूर्वीच पाहणी अभियान करण्याची लेखी मागणी केली होती. आपल्या कार्यालयाकडून केवळ निवेदन फॉरवर्ड करण्यात आले, परंतु कार्यवाही झालीच नाही. आज सांयकाळनंतर सानपाडा सेक्टर २ परिसरात काळाकुट्ट अंधार पसरलेला दिसून येत आहे. पथदिवे सर्वच बंद असल्याने अंधाराचा गैरफायदा घेत समाजातील विकृतांकडून महिलांची तसेच मुलींची छेडछाड अथवा अन्य गैरप्रकारही होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पावसामध्ये काही घटना घडल्यास कोणाला आवाजही जाणे शक्य नाही. अंधारात ज्येष्ठ नागरिकांना, लहान मुलांना ये-जा करण्यास त्रास होत आहे. समस्येचे गांभीर्य पाहता सानपाडा सेक्टर २ परिसरातील प्रियंका सोसायटीपासून ते निळकंठ टॉवरपर्यत बंद असलेल्या पथदिव्यांची तात्काळ दुरूस्ती करून स्थानिक रहीवाशांना दिलासा द्यावा अशी लेखी मागणी पांडुरंग आमले यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनातून केली होती.

ही समस्या सोडविण्यासाठी पांडुरंग आमले यांनी पालिका आयुक्तांकडे १२ जुलै व १७ जुलै २०२३ रोजीही लेखी निवेदन दिले होते. समस्येचे गांभीर्य व अंधाराचा गैरफायदा घेत समाजविघातक शक्ती महिलांबाबत, मुलींबाबत गैरप्रकार करण्याची भीती आहे. पावसाचे दिवस आहेत. पावसामध्ये दुर्घटना घडल्यास आवाजही येणार नाही. समस्या गंभीर आहे. करदात्या नागरिकांना या परिसरातून अंधारातच ये-जा करावी लागत आहे. आपण येथील पथदिवे तातडीने दुरूस्त करण्याविषयी संबंधितांना निर्देश द्यावेत अशी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांना कळकळीची विनंती केली आहे.

Previous Post

नेरूळ सेक्टर सहा परिसरात तातडीने वृक्षछाटणी करा :  जीवन गव्हाणे

Next Post

नेरूळ सेक्टर सहामधील पदपथावरील झाडांच्या फांद्या नियमितपणे उचलण्याचे निर्देश द्या : जीवन गव्हाणे

Next Post
२० कर्मचाऱ्यांना पदोन्नती तसेच ३० कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा कर्मचारीहिताय निर्णय

नेरूळ सेक्टर सहामधील पदपथावरील झाडांच्या फांद्या नियमितपणे उचलण्याचे निर्देश द्या : जीवन गव्हाणे

नवी मुंबईतील संभाव्य दरडग्रस्त ठिकाणांची बारकाईने पाहणी

नवी मुंबईतील संभाव्य दरडग्रस्त ठिकाणांची बारकाईने पाहणी

अन् मदतीसाठी सरसावले अनेक हात….! 

अन् मदतीसाठी सरसावले अनेक हात….! 

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com