• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 22, 2023

नवी मुंबईतील संभाव्य दरडग्रस्त ठिकाणांची बारकाईने पाहणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबईतील संभाव्य दरडग्रस्त ठिकाणांची बारकाईने पाहणी

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : खालापूर तालुक्यात इर्शाळवाडीत घडलेल्या दरड दुर्घटनेत मध्यरात्रीच नवी मुंबई महानगरपालिकेची मदतकार्य पथके महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निदर्शनानुसार घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्याला सुरुवात करण्यात आली होती. त्याचप्रमाणे आयुक्तांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील संभाव्य दरडग्रस्त ठिकाणांची पाहणी करण्याचे व त्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभाग तसेच संबधित विभाग अधिकारी यांना दिले होते.

त्यास अनुसरुन शहर अभियंता संजय देसाई यांच्या नियंत्रणाखाली सर्व विभागांचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी आपल्या सहकारी अभियंत्यांसह सकाळपासूनच आपापल्या कार्यक्षेत्रातील संभाव्य दरडग्रस्त ठिकाणांची पाहणी केली. परिमंडळ १ विभागाचे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ २ विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार यांनीही विभाग अधिकारी यांच्यासमवेत पाहणी करून निर्देश दिले.

त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनीही आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्यासमवेत काही ठिकाणांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली व संबधित अधिकाऱ्यांना त्याठिकाणी नियमित काटेकोर लक्ष देण्याच्या सूचना केल्या.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दरड कोसळण्याची शक्यता असणाऱ्या १५ संभाव्य ठिकाणांची यादी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आली असून ही यादी विभाग कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार तयार करण्यात आलेली आहे.

यामधील रमेश मेटल कॉरी व इतर काही धोकादायक ठिकाणांची स्वत: आयुक्त राजेश नार्वेकर यांनी पावसाळ्यापूर्वीच प्रत्यक्ष पहाणी केली होती. यावेळी आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार दरड कोसळण्याची शक्यता असणा-या संभाव्य ठिकाणी धोक्याची सूचना देणारे फलकही महानगरपालिकेमार्फत लावण्यात आले होते. सदरचे फलक लावलेल्या जागेवर नसल्यास ते आज सर्वेक्षण करताना पूर्ववत लावून घ्यावेत असेही आयुक्तांमार्फत निर्देशीत करण्यात आले आहे.

पावसाळा कालावधीत येथील नागरिकांना धोक्याची कल्पना देऊन वारंवार सूचना करुनही नागरिकांकडून सदर जागा सोडण्यास अनास्था दिसून येते. तथापि इर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना धोक्याची पुर्वकल्पना दयावी व त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवावे असे आयुक्तांनी निर्देश देत कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये याची दक्षता घेण्याचे महापालिकेच्या सर्व यंत्रणांना निर्देश दिले आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील संभाव्य दरडग्रस्त ठिकाणी डोंगराळ भागात राहणाऱ्या रहिवाशांनी आपल्या संरक्षणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करुन संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

नेरूळ सेक्टर सहामधील पदपथावरील झाडांच्या फांद्या नियमितपणे उचलण्याचे निर्देश द्या : जीवन गव्हाणे

Next Post

अन् मदतीसाठी सरसावले अनेक हात….! 

Next Post
अन् मदतीसाठी सरसावले अनेक हात….! 

अन् मदतीसाठी सरसावले अनेक हात….! 

सामाजिक उपक्रमाने कोपरखैराणेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस साजरा

सामाजिक उपक्रमाने कोपरखैराणेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस साजरा

भाजपच्या नवी मुंबईच्या रथाचे संदीप नाईक बनले सारथी

भाजपच्या नवी मुंबईच्या रथाचे संदीप नाईक बनले सारथी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com