• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 13, 2023

कौशल्यवर्धित उद्योगाभिमुख ४१ प्रकारच्या प्रशिक्षणांचा लाभ घेण्याचे आवाहन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कौशल्यवर्धित उद्योगाभिमुख ४१ प्रकारच्या प्रशिक्षणांचा लाभ घेण्याचे आवाहन

स्वयंम फिचर्स : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध समाज घटकांसाठी नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत असून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा यादृष्टीने या योजनांची माहिती विविध माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.

अशाच प्रकारची एक अभिनव योजना युवक – युवती यांच्याकरिता राबविण्यात येत असून याद्वारे ४१ प्रकारचे कौशल्यवर्धित प्रशिक्षण युवकांना दिले जात आहे. या प्रशिक्षणाद्वारे एखाद्या विशिष्ट विषयात कौशल्यवृद्धी व्हावी व यामधून रोजगार व स्वयंरोजगाराकरिता तरुणाईला त्याचा उपयोग व्हावा ही भूमिका नजरेसमोर ठेवण्यात आलेली आहे.

तथापि या योजनेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती व विमुक्त भटक्या जमाती अशा मागासवर्गीय घटकांतील युवक – युवतींचा तितकासा प्रतिसाद आढळून येत नाही. ही सर्व कौशल्यवर्धित प्रशिक्षणे त्यांच्या विकासाकरिता व त्यांच्याकडील ज्ञान वाढवण्याकरता अत्यंत महत्त्वाची असून या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

या ४१ प्रकारच्या प्रशिक्षणामध्ये – शिवणकाम, फॅशन डिझाइनिंग, मेहंदी व ब्युटीशियन, ॲडव्हान्स ब्युटिशियन, एमएससीआयटी, डीटीपी ग्राफिक्स अँड आर्ट्स ( पेजमेकर, कोरल ड्रॉ, फोटोशॉप), कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग, मल्टीमीडिया अँड ॲनिमेशन टेक्नॉलॉजी, फ्लोरीस्ट (पुष्पसजावट), वेब डिझाईनिंग, कॉम्प्युटर बेसिक प्रोग्रामिंग( सी अॅन्ड सी++), ई-टॅक्सेशन/ टॅली/ ईआरपी, वाहन चालविणे (तीन चाकी व चार चाकी), जड वाहन चालविणे, ओल्या व सुक्या कचऱ्यापासून खत तयार करणे (गृहनिर्माण सोसायटींमध्ये), कॅटरिंग व बेकरी प्रॉडक्ट्स, फ्रिज/ एसी/ वॉशिंग मशीन दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती /लॅपटॉप व संगणक दुरुस्ती, बॅग बनवणे / पर्स / कागदी डिशेस/ मिठाई बॉक्स बनविणे, दोन चाकी / चार चाकी वाहने मेकॅनिक कोर्स, इलेक्ट्रिशियन, मोत्यांचे दागिने बनविणे (ज्वेलरी मेकिंग), फ्लोरीस्ट/ फुलांच्या परड्या बनविणे (पुष्प सजावट), वारली पेंटिंग, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, वॉशिंग पावडर व सोप बनविणे/ फ्लोअर क्लीनर तयार करणे, विविध मसाले बनविणे/ पापड – लोणची बनविणे, फळ प्रक्रिया ( सॉस, जॅम, लोणची इत्यादी), रिटेल मार्केटिंग (किरकोळ विपणन), टायपिंग, बेडसाईड असिस्टंट, रंगकाम, कॅलिग्राफी, हॉस्पिटलिटी मॅनेजमेंट, स्टेनोग्राफी, क्रेश /बेबी सीटिंग केअर टेकर ट्रेनिंग, फॉरेन लँग्वेजेस, रिटेल सेल्स असोसिएट्स, ग्राहक सेवा कार्यकारी (कॉल सेंटर), विविध प्रकारच्या मेणबत्ती/ अगरबत्ती/ धूप /सुगंधी उटणे/ फेस पॅक/ सुगंधी तेल /हर्बल मेहंदी तयार करणे, कुशन कव्हर/डोअर मॅट/ रजई तयार करणे अशा ४१ प्रकारच्या व्यवसाय प्रशिक्षणांचा समावेश आहे.

या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याच्या कुटुंबाचे नवी मुंबई महापालिका क्षेत्रात किमान तीन वर्षे वास्तव्य असल्याबाबतचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अर्जदाराच्या वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा पॅन कार्डची छायाप्रत जोडणे आवश्यक असेल तसेच अर्जदाराने मागासवर्गीय असल्याबाबतचा जातीचा दाखला जोडणे अनिवार्य राहील.

या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी व याबाबतच्या अधिक माहिती करिता बेलापूर – नेरूळ विभाग : प्रकाश कांबळे (९९६९००८०८८), वाशी – तुर्भे विभाग : सुंदर परदेशी (९५९४८४१६६६), कोपरखैरणे – घणसोली विभाग : दादासाहेब भोसले (९३७२१०६९७६), ऐरोली – दिघा विभाग : दशरथ गंभीरे (९७०२३०९०५४) या नमुंमपा समाजसेवकांशी संपर्क साधावा व सदर ४१ विविध प्रकारच्या प्रशिक्षण योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन समाजविकास विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

कोविड आरोग्य केंद्रातील ऑक्सिजन साठवण टाक्यांसह ऑक्सिजन सिलेंडरचे महापालिकेला विनामूल्य हस्तांतरण करण्याचा सिडकोचा निर्णय

Next Post

२० कर्मचाऱ्यांना पदोन्नती तसेच ३० कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा कर्मचारीहिताय निर्णय

Next Post
२० कर्मचाऱ्यांना पदोन्नती तसेच ३० कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा कर्मचारीहिताय निर्णय

२० कर्मचाऱ्यांना पदोन्नती तसेच ३० कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा कर्मचारीहिताय निर्णय

जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त विशेष जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त विशेष जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडविण्याचे नवी मुंबई इंटकचे मनपा आयुक्तांना साकडे

कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडविण्याचे नवी मुंबई इंटकचे मनपा आयुक्तांना साकडे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com