• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 18, 2023

भाजपा सरकारकडून वारकरी संप्रदायाचा अपमान: अतुल लोंढे

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मोदी सरकारने गरिबांच्या तोंडचा घास हिरावला : अतुल लोंढे

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : जगतगुरु संत तुकाराम महाराज व वारकरी चळवळ ही महाराष्ट्राला लाभलेली मोठी परंपरा आहे. थोर साधु संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात आज संतांचा अपमान करणाऱ्यांच्या कार्यक्रमाला खुलेआम परवानगी दिली जाते. बागेश्वर धामच्या भोंदू बाबाच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन राज्यातील भाजपाप्रणित सरकारने संत तुकाराम महाराज व वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, ज्या धीरेंद्र शास्त्रीने जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा अपमान केला त्यावर राज्य सरकार कुठलीच कारवाई करत नाही उलट मीरा रोड येथील दोन दिवसाच्या कार्यक्रमाला परवानगी देते. काँग्रेस पक्षाने या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती. काही संघटनांनी सुध्दा या कार्यक्रमाला विरोध केला आहे, असे असतानाही भाजपाप्रणित सरकार या कार्यक्रमाला परवानगी देऊन ते मनुवादी आहेत यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. वारकरी संप्रदायाने कधीही जातपात पाहिली नाही. जगतगुरु संत तुकाराम महाराज व वारकरी संप्रदायाला माननाऱ्या महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिले आहे की भाजपा वारकरीविरोधी आहे. जातीपातीच्यावर जाणून एकमेकांना माऊली म्हणणारा वारकरी संप्रदाय भाजपाला नको आहे, असे संत, महापुरुष भाजपाला नको आहेत. त्यांना मनुवाद करणारे, जातीभेद करणारे, धर्मावरून तेढ निर्माण करणारे बागेश्वर धामच्या भोंदूबाबासारखे लोक त्यांना हवे असल्याची घणाघाती टीका लोंढे यांनी यावेळी केली.

Previous Post

सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठीची अट शिथिल करावी : संदीप नाईक

Next Post

रस्त्यावरील अर्धवट खड्डे बुजवा : भरत जाधव

Next Post
रस्त्यावरील अर्धवट खड्डे बुजवा : भरत जाधव

रस्त्यावरील अर्धवट खड्डे बुजवा : भरत जाधव

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या साप्ताहिक विभागाची राज्य कार्यकारिणी, सर्व जिल्हाध्यक्षांची होणार नियुक्ती

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या साप्ताहिक विभागाची राज्य कार्यकारिणी, सर्व जिल्हाध्यक्षांची होणार नियुक्ती

क्रिडांगणावरील नामफलकाची दुरुस्ती तात्काळ करा : पांडुरंग आमले

क्रिडांगणावरील नामफलकाची दुरुस्ती तात्काळ करा : पांडुरंग आमले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com