• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 11, 2023

गुणवंत क्रीडापटू घडविण्यासाठी महापालिका कटिबध्द : क्रीडा उपआयुक्त सोमनाथ पोटरे

adminbyadmin
in नवी मुंबई
0
गुणवंत क्रीडापटू घडविण्यासाठी महापालिका कटिबध्द : क्रीडा उपआयुक्त सोमनाथ पोटरे

अविनाश तावडे : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई महानगरपालिका चषक जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत ४०० हून अधिक जलतरणपटूंचा उत्साही सहभाग

विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात नवी मुंबई महानगरपालिका कटिबध्द असून या माध्यमातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तर गाजविणारे नवी मुंबईकर खेळाडू घडतील असा विश्वास नवी मुंबई महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे यांनी व्यक्त केला.

वाशी येथील फादर ॲग्नेल जलतरण तलावात महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महानगरपालिका चषक जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.

यावेळी क्रीडा उपआयुक्त सोमनाथ पोटरे यांचेसह साहसी जलतरण क्षेत्रातील राष्ट्रीय तेनझिंग नोर्गे पुरस्कार विजेते जलतरणपटू शुभम वनमाळी, फादर ॲग्नेल शिक्षण संस्थेचे प्रमुख फादर अल्मेडा, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते जलतरणपटू रूपाली रेपाळे व गोकुळ कामथ, मुंबई विभाग व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव धनंजय वनमाळी, राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

लहानपणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या जलतरण स्पर्धेत सहभागी होत होतो, तेव्हापासून मिळालेल्या प्रोत्साहनाचा माझ्या आजवरच्या यशात महत्वाचा वाटा असल्याचे सांगत यंदा ४०० हून अधिक जलतरणपटूंना या स्पर्धेत सहभाग घेतला ही अत्यंत आनंदाची गोष्ट असल्याचे मत राष्ट्रीय मानाचा तेनझिंग नोर्गे पुरस्कारप्राप्त साहसी जलतरणपटू शुभम वनमाळी यांनी व्यक्त केले.

नवी मुंबईतील मुलांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली असून नवी मुंबई महापालिका विविध स्पर्धांच्या नियमित आयोजनातून खेळाडूंना आपला खेळ सिध्द करण्याची संधी देण्याचे चांगले आणि महत्वाचे काम करीत असल्याचा विशेष उल्लेख फादर अल्मेडा यांनी याप्रसंगी मनोगतात केला.

मागील दोन वर्षांच्या कोव्हीड प्रभावित कालावधीनंतर या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा संपन्न होत असल्याने यामध्ये सहभागासाठी मुले आणि युवकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता. यावर्षी ४०० हून अधिक जलतरणपटू या स्पर्धेत सहभागी झाले असून उद्या रविवार दि. १२ फेब्रुवारी रोजी, सायंकाळी ४ वाजता या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक करण्यासाठी क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नवी मुंबई महापालिका क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

पत्रकार वारिशेंच्या हत्येचा तपास उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या देखरेखीखाली करावा : अतुल लोंढे

Next Post

प्रभाग ३० मध्ये नियमितपणे मूषक नियत्रंण अभियान राबवा : पांडुरंग आमले

Next Post
एक दिवा राम मंदिरासाठी, एक दिवा प्रभू श्री रामासाठी, सानपाड्यात रविवारी दिपोत्सव

प्रभाग ३० मध्ये नियमितपणे मूषक नियत्रंण अभियान राबवा : पांडुरंग आमले

जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

शिष्यवृत्ती अर्ज भरण्याच्या कालावधीसाठी मुदत वाढवून द्या : विद्या भांडेकर

सारसोळे गाव, कुकशेत गाव व नेरूळ सेक्टर ६ मध्ये जनजागृतीसाठी आरोग्य अभियान राबवा : सौ. सुजाता सुरज पाटील

प्रभाग ३४ मधील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचा कालावधी वाढवा : सौ. सुजाता सुरज पाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com