• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 15, 2023

शिष्यवृत्ती अर्ज भरण्याच्या कालावधीसाठी मुदत वाढवून द्या : विद्या भांडेकर

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जुईनगरमधील उद्यानात ओपन जीम सुरू करा : विद्या भांडेकर

अविनाश तावडे : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी अर्ज भरावयाच्या मुदतीत पालिका प्रशासनाने २८ फेब्रुवारीपर्यत मुदत वाढवून देण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

महापालिका प्रशासन इयत्ता पहिली ते पदवी व अन्य अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या गरीब घरातील गुणवंत व हुशार मुलांना दरवर्षी शिष्यवृत्ती देत असते. गरीब व गरजू परिवारातील विद्यार्थ्यांना महागाईच्या काळात शिष्यवृत्तीचा हातभार लागत असतो. शिष्यवृत्ती हा खरोखरीच महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी राबविला जाणारा स्तुत्य व प्रशंसनीय कार्यक्रम आहे.  दरवर्षी ऑफलाइन अर्ज भरल्यामुळे सर्वसामान्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरताना त्रास होत नव्हता. परंतु ऑनलाइन पद्धतीमुळे पालकांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरताना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला आहे. अनेकदा पालिकेचा सर्व्हर डाऊन असणे, बॅंकाचा संप व सार्वजनिक सुट्यांमुळे बॅंका बंद, इंटरनेटची समस्या, बॅक खाते उघडणे तसेच उत्पन्नाचा दाखला काढणे यासाठी गेलेला वेळ पाहता पालिका प्रशासनाने १५ फेब्रुवारी या दिलेल्या मुदतीत शिष्यवृत्तीचा अर्ज भरणे असंख्य पालकांना शक्य झालेले नाही. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शिष्यवृत्तीला मुकण्याची भीती आहे. समस्येचे गांभीर्य पाहता शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत वाढवून देण्याची मागणी श्रीमती विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Previous Post

प्रभाग ३० मध्ये नियमितपणे मूषक नियत्रंण अभियान राबवा : पांडुरंग आमले

Next Post

प्रभाग ३४ मधील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचा कालावधी वाढवा : सौ. सुजाता सुरज पाटील

Next Post
सारसोळे गाव, कुकशेत गाव व नेरूळ सेक्टर ६ मध्ये जनजागृतीसाठी आरोग्य अभियान राबवा : सौ. सुजाता सुरज पाटील

प्रभाग ३४ मधील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचा कालावधी वाढवा : सौ. सुजाता सुरज पाटील

रविंद्र सावंत यांच्या प्रयत्नांमुळे गृहनिर्माण सोसायट्यांसमोरील अंधार संपुष्ठात

रविंद्र सावंत यांच्या प्रयत्नांमुळे गृहनिर्माण सोसायट्यांसमोरील अंधार संपुष्ठात

वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com