• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, June 14, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 7, 2023

सोमवारपासून ठाण्यात रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला

adminbyadmin
in ठाणे
0
सोमवारपासून ठाण्यात रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com : ९८२००९६५७३

ठाणे : कै. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला यंदा ९  जानेवारी ते १५ जानेवारी २०२३  दरम्यान होत आहे. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला समितीने आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेचे यंदा ३७ वे वर्ष असून कोविड काळानंतर प्रथमच ठिकाण नौपाड्यातील सरस्वती मंदिर शाळेच्या पटांगण, मल्हार टॉकीज समोर ,ठाणे येथे होत आहे,  अशी माहिती व्याख्यानमालेचे संस्थापक, अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी दिली.

रामभाऊ म्हाळगी व्याख्यानामाला ठाणेकरांसाठी बौध्दिक मेजवानी असल्याने या व्याख्यानमालेची आवर्जून वाट पाहिली जाते. गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून नौपाडा येथील सरस्वती शाळेच्या बंदिस्त सभागृहात पार पडली. यंदा मात्र खुल्या पटांगणात व्याख्यानमाला होत असून ९ जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत दररोज वेळ रात्रो ठीक  ८.१५ वाजता ही व्याख्यानमाला होणार आहे. ९ जानेवारी रोजी राजकिय विश्लेषक प्रा.संगीत रागी हे आझादी का अमृतमहोत्सव यावर भाष्य करणार आहेत. त्यानंतर १० जानेवारी रोजी डायबेटीस अपाय आणि उपाय या विषयावर डॉ. तुषार रेगे श्रोत्यांना आरोग्यमंत्र देतील. ११ जानेवारी रोजी मिशन आयएएसचे संचालक प्रा.नरेशचंद्र काठोळे हे ‘आव्हान स्पर्धा परिक्षांचे, १२ जाने. ला सुप्रसिद्ध गायक, संगीतकार राहुल देशपांडे यांची प्रकट मुलाखत डॉ. किर्ती आगाशे घेतील. तर १३ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश उदय लळीत संसदीय विशेषाधिकार आणि संसद अवमानना अधिकार यावर माहिती देतील. १४ जानेवारी रोजी दीपस्तंभ आधार निराधारांचा या विषयावर यजुवेंद्र महाजन यांचे व्य़ाख्यान असेल. तर समारोपास रविवार १५ जानेवारी रोजी चाणक्य फेम अभिनेता, सिनेदिग्दर्शक डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी उज्वल इतिहास से अमृतकाल की ओर यासंदर्भातील किस्से उलगडतील.

गेली ३६ वर्षे ही व्याख्यानमाला ठराविक दिवशी याच ठिकाणी आयोजित केली जात असून विशेष म्हणजे आतापर्यंत २४६ मान्यवरांनी या माध्यमातुन श्रोत्यांना मार्गदर्शन केले आहे. ज्ञान, प्रबोधन आणि मनोरंजन या त्रिसुत्रीवर व्याख्यानमाला आधारलेली असून ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे ही व्याख्यानमाला महाराष्ट्रातील प्रतिष्ठित व्याख्यानमाला म्हणून ओळखली जाते. आयोजक रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला समिती ठाणेतर्फे सर्वाना सहर्ष  आग्रहाचे  निमंत्रण असेही आ. संजय केळकर यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी संपर्क

संजय केळकर ०२२२५३३३८५०

शरद पुरोहित  ९३२२२१०४२४

सुहास जावडेकर ९८२०५२८३५५

Previous Post

नवी मुंबईची रणरागिनी

Next Post

छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नवनियुक्त सरपंचांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Next Post
छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नवनियुक्त सरपंचांचा राष्ट्रवादीत प्रवेश

छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नवनियुक्त सरपंचांचा राष्ट्रवादीत प्रवेश

सेझसंदर्भात १ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी रायगड येथे सुनावणी

सेझसंदर्भात १ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी रायगड येथे सुनावणी

सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेस २१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेस २१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com