• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 12, 2022

पनवेलमध्ये भरणार रविवारी योजनांचा महामेळावा

adminbyadmin
in पनवेल
0
पनवेलमध्ये भरणार रविवारी योजनांचा महामेळावा

विठ्ठल ममताबादे

उरण : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधी सेवा समिती आणि पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १३ नोव्हेंबर रोजी पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये विविध शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्याचे बाबत माध्यमांना अवगत करण्यासाठी जिल्हा न्यायाधीश- १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पनवेल जयराज वडणे यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले. यावेळी पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष मनोज भुजबळ उपस्थित होते.

जयराज वडणे यावेळी म्हणाले की, नागरिकांना लाभदायी ठरणाऱ्या १८ योजनांचे स्टॉल्स उभारण्यात आलेले असून,३१ ऑक्टोबरपासून हे अभियान सुरू झाले आहे. १३ नोव्हेंबर रोजी या अभियानाची सांगता होत असून यावेळी प्रातिनिधीक स्वरूपामध्ये लाभार्थींना वाटप केले जाणार आहे. सदरच्या कार्यक्रमासाठी मुख्य जिल्हा न्यायाधीश,अलिबाग येथून सावंत मॅडम, जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त, पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष मनोज भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. नागरिकांनी या योजनांच्या महामेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी वडणे यांनी केले. तर यावेळी मनोज भुजबळ यांनी विधी सेवा समिती, पनवेल करत असलेल्या विविध उपक्रमाबाबत माध्यमांना अवगत केले.

 ****

पनवेल विधी सेवा समितीच्या वतीने सर्वांना न्याय मागण्याचा अधिकार प्राप्त व्हावा या उदात्त हेतूने तळोजा कारागृहात जाऊन तब्बल २८७५ कैद्यांची एका प्रश्नावली द्वारे मुलाखती घेऊन त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.

– ॲड मनोज भुजबळ.

*****

पनवेल विधी सेवा समितीने आदिवासी बांधवांच्या २५ प्रमुख व्यक्तींना कायदेविषयक मार्गदर्शन केले, तसेच त्यांच्या न्याय हक्कांचे बाबत त्यांना जागृत केले व त्यांच्या साठी विशेषत्वाने असलेल्या कायद्यांची त्यांना जाणीव करून दिली. मला खात्री आहे की हे 25 आदिवासी बांधव किमान अडीच हजार आदिवासींपर्यंत हे ज्ञान पोहोचवून त्यांच्या अधिकारांची त्यांना जाणीव करून देतील.

– जयराज वडणे

 

Previous Post

शेतकरी व कामगारांच्या खिशातील पैसा मोदी उद्योगपतींना देतात : राहूल गांधी

Next Post

चित्रा वाघ यांनी संजय राठोडांची माफी मागून त्यांची दीदी व्हावे : सुषमा अंधारे

Next Post
चित्रा वाघ यांनी संजय राठोडांची माफी मागून त्यांची दीदी व्हावे : सुषमा अंधारे

चित्रा वाघ यांनी संजय राठोडांची माफी मागून त्यांची दीदी व्हावे : सुषमा अंधारे

नेरूळ सेक्टर सहामधील आधार कार्ड शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

नेरूळ सेक्टर सहामधील आधार कार्ड शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकोपयोगी उपक्रमांच्या सप्तहांनी होणार महादेव पवारांचा वाढदिवस साजरा

नेरूळमध्ये सोमवारपासून ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्या दारी’

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com