• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 9, 2022

प्रशांत दामले यांचा नवी मुंबईकरांतर्फे विशेष सन्मान

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
प्रशांत दामले यांचा नवी मुंबईकरांतर्फे विशेष सन्मान

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील :Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : मराठी नाटकांवर भरभरून प्रेम करणारी रसिक माणसे ही ऊर्जा असून ३२ वर्षात १२५०० प्रयोग करू शकलो ते उत्तम दिग्दर्शक, सहकलाकार लाभले म्हणूनच असे सांगत सुप्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले यांनी रसिकांचा कायम आशिर्वाद लाभला हेच या विक्रमी प्रयोगांमागील खरे गमक असल्याचे नवी मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृहातील विशेष सत्काराप्रसंगी सांगितले.

महाराष्ट्रात ५२ ठिकाणी नाट्यप्रयोग होऊ शकतात, त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे विष्णुदास भावे नाट्यगृह स्वच्छता आणि सुविधांच्या दृष्टीने टॉप फाईव्हमध्ये असून त्यासाठी महापालिका आयुक्त आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नियमित जागरूकतेबद्दल प्रशांत दामले यांनी गौरवोद्गार काढले. नवी मुंबईतील भावे नाट्यगृह उत्तम आहेच त्या सोबतच नाटक कसे बघायचे हे उत्तमरित्या कळणारे नाट्यरसिक इथे आहेत असा विशेष उल्लेख त्यांनी केला.

आपल्या ३९ वर्षांच्या रंगभूमीवरील अभिनय कारकिर्दीत १२,५०० प्रयोगांचा टप्पा पार करण्याचा अनोखा विक्रम करणारे सुप्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले यांचा विष्णुदास भावे नाट्यगृह येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रशासन विभागाचे उप आयुक्त नितीन नार्वेकर आणि क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे उप आयुक्त सोमनाथ पोटरे यांच्या हस्ते शाल, पुणेरी पगडी व सन्मानचिन्ह प्रदान करून विशेष सन्मान कऱण्यात आला. एका लग्नाची पुढची गोष्ट हा हाऊसफुल्ल नाट्यप्रयोगाप्रसंगी संपन्न झालेल्या या गौरवाप्रसंगी नाटकातील सहकलावंत कविता मेढेकर, अतुल तोडणकर, पूर्वा भिडे, अतुल तोडणकर, राजसी चिटणीस, राजसिंह देशमुख, पराग डांगे यांनाही सन्मानीत करण्यात आले.

१९८३ साली टुरटूर या नाटकापासून आपल्या व्यावसायिक अभिनय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या प्रशांत दामले यांनी आपल्या ३९ वर्षांच्या नाट्यकारकिर्दीत १२,५०० हून अधिक नाट्यप्रयोग केले. या विक्रमानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोद्य यांच्या हस्ते त्यांच्या कारकिर्दीचा मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे १२,५०० व्या प्रयोगाप्रसंगी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून विशेष गौरव करण्यात आला. सुप्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही आपल्या ब्लॉगवरून मराठी रसिकांना नाटकांवर प्रेम करायला लावण्यात प्रशांतजींचे मोठे योगदान असल्याचे लिहीत प्रशांतजींच्या कामाचा मी चाहता असल्याचे मत व्यक्त केले.

रंगभूमीवरील या विक्रमी वाटचालीबद्दल नवी मुंबई महापालिकेनेही १२,५०३ व्या प्रयोगाप्रसंगी विष्णुदास भावे नाट्यगृहात विशेष सन्मान करीत  प्रशांत दामले यांचे समस्त नवी मुंबईकर नागरिकांच्या वतीने अभिनंदन करीत त्यांच्या आगामी कारकिर्दीला शुभेच्छा दिल्या.

Previous Post

मोदींनी महाराष्ट्राचे उद्योग राज्याबाहेर नेऊन तरुणांचे रोजगार, नोकऱ्या हिरावल्या : राहुल गांधी

Next Post

एवढंच ना …ह्या मराठी चित्रपटाची नवी मुंबईत घोषणा

Next Post
एवढंच ना …ह्या मराठी चित्रपटाची नवी मुंबईत घोषणा

एवढंच ना ...ह्या मराठी चित्रपटाची नवी मुंबईत घोषणा

आमदार आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत आ. मंदाताई म्हात्रेंचा ग्रामस्थांशी संवाद 

आमदार आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत आ. मंदाताई म्हात्रेंचा ग्रामस्थांशी संवाद 

सामाजिक संस्थासहऔद्योगिक संस्थांची संयुक्त बैठक घ्या : सोमनाथ वासकर

सामाजिक संस्थासहऔद्योगिक संस्थांची संयुक्त बैठक घ्या : सोमनाथ वासकर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com