• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 16, 2022

वेतनासाठी उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांचे भीक मांगो आंदोलन

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
वेतनासाठी उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांचे भीक मांगो आंदोलन

नवी मुंबई : विघ्नहर्ता गणरायाचे आगमनही झाले आणि विसर्जनही झाले, परंतु नवी मुंबई महापालिकेत काम करणाऱ्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांचे १६८ कर्मचाऱ्यांचे अद्यापि वेतन झालेले नाही. महापालिका आयुक्तांनी गणेशोत्सवापूर्वी वेतन देण्याच्या आदेशाला ठेकेदारांकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे. यामुळे वेतनासाठी महापालिका प्रशासनाचे व आपणावर ठेकेदारांकडून  होत असलेल्या अन्यायाकडे नवी मुंबईकरांचे लक्ष वेधण्यासाठी वाशी सेक्टर १७ मधील छत्रपती शिवाजी चौकात माळी कामगारांच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

नवी मुंबई महानगर पालिकेतील उद्यान विभागातील वाशी, तुर्भे, नेरूळ येथील माळी कामगारांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन अद्यापी ठेकेदारांकडून  मिळालेले नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ३० ऑगस्ट पर्यत महापालिकेतील कायम, ठोक, कंत्राटी तसेच अन्य आस्थापनेतील सर्वच कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले होते. परंतु आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत ठेकेदारांनी आजपर्यत उद्यान विभागातील १६८ माळी कर्मचाऱ्यांना वेतन न दिल्याने माळी कामगारांकडून वाशीत भीक मांगो आंदोलन करण्यात आले.

 ऐरोली विभागातील उद्यान कामगारांनी ४ वेळा मुख्यालयाबाहेर आंदोलन केल्यानंतर त्यांचे वेतन दोन दिवसापूर्वी ठेकेदारांकडून करण्यात आले आहे. परंतु इतर विभागातील कामगारांना वेतन दिलेले नाही.  स्वमालकीचे धरण आणि तिजोरीत अडीच हजार कोटींच्या ठेवी असणाऱ्या नवी मुंबईसारख्या श्रीमंत महापालिकेतील उद्यान विभागातील कामगारांवर मासिक वेतनासाठी भिक मांगो आंदोलन करण्याची नामुष्की शुक्रवारी आली.

वाशी विभागातील ७३, नेरुळ विभागातील ६०, तुर्भे विभागातील ३५ माळी कामगार वेतनापासून वंचित आहेत. वाशीच्या कर्मर्चाऱ्यांना एन के शहा इंटरप्रायझेस,  नेरूळच्या कर्मचाऱ्यांना जय भवानी इंटरप्रायझेस, तुर्भेतील कर्मचाऱ्यांना डी एम इंटरप्रायझेस या ठेकेदारांकडून वेतन न मिळाल्याने कामगारांनी भीक मांगो आंदोलन केले व या आंदोलनामुळे ठेकेदारांचा मुजोरपणा व पालिका आयुक्तांच्या आदेशाला दाखविण्यात आलेली केराची टोपली या बाबी नवी मुंबईकरांच्या निदर्शनास आल्या.

या आंदोलनात समाज समता कामगार संघाचे सरचिटणीस मंगेश लाड, महेंद्र पाटील, गणेश पाटील, परेश सावंत, यशवंत पाटील, रवी धोंडकर, वसंत भगत आणि उद्यान विभागातील कामगार सहभागी होते.

Previous Post

खारघर एनआयएफटीमध्ये नझम-ए-हसरत ऑनलाइन गीत लेखन कार्यशाळा

Next Post

मुख्यमंत्री महोदय, वेतन थकलेल्या माळी कामगारांना न्याय द्या: ठेकेदारांवर कारवाई करण्याची संदीप खांडगेपाटील यांची मागणी

Next Post
नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू उद्यान स्थानिक रहीवाशांसाठी खुले करा : संदीप खांडगेपाटील

मुख्यमंत्री महोदय, वेतन थकलेल्या माळी कामगारांना न्याय द्या: ठेकेदारांवर कारवाई करण्याची संदीप खांडगेपाटील यांची मागणी

स्वाभिमानातून निर्माण झालेल्या पक्षातच गळचेपी कशी सहन करायची ? अशोक गावडे

स्वाभिमानातून निर्माण झालेल्या पक्षातच गळचेपी कशी सहन करायची ? अशोक गावडे

नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू उद्यान स्थानिक रहीवाशांसाठी खुले करा : संदीप खांडगेपाटील

मुख्यमंत्री महोदय, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पीएफचा वेळेवर भरणा न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा : संदीप खांडगेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com