• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 24, 2022

तुर्भे बसडेपोच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
तुर्भे बसडेपोच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन

Navimumbailive.com@gmail.com – ९८२००९६५७३/ ८३६९९२४६४६

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या तुर्भे बसडेपोच्या प्रवेशद्वारालगत उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र कर्मचारी युनियन या कामगार संघटनेच्या नामफलकाचे उद्घाटन बुधवारी कामगार नेते  व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र कर्मचारी युनियन ही कामगार संघटना इंटक संलग्न असून गेल्या काही वर्षात कामगारांच्या प्रशासन दरबारी समस्या सोडविणे व कामगारांना सुविधा मिळवून देणे याबाबत महाराष्ट्र कर्मचारी युनियने उल्लेखनीय कार्य केल्याने महापालिका कामगार वर्तुळात ही कामगार संघटना अल्पावधीतच नावारुपाला आलेली आहे. कंत्राटी कामगार, ठोक मानधनावरील कामगार, कायम सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा व भेडसावणाऱ्या असुविधांचा महाराष्ट्र कर्मचारी युनियनने प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून अधिकांश समस्या सोडविण्यात यश मिळविले आहे. कामगारांची पदोन्नती, कोव्हिड काळातील भत्ता, विलंबाने होणारे वेतन, ठेकेदारांकडून होणारी कामगारांची पिळवणूक, वेतन वाढ,  वैद्यकीय विभाग, वाहन चालक, चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या असुविधा, मयत कामगारांच्या वारसांना नोकरी, आरोग्य सुविधा, पीएफसंबंधातील प्रश्न यासह असंख्य समस्यांचे निवारण महाराष्ट्र कर्मचारी युनियनने कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली केले आहे. यासह महापालिका आरोग्य विभागातही आपल्या कामातून युनियनने वेगळा ठसा अल्पावधीत उमटवलेला आहे. रविकुमार सोमवंशी हे कामगार बरेच दिवस आजारपणामुळे घरीच बसून आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजुक असल्याने संघटनेच्या माध्यमातून १५०० हजाराचा धनादेश मदत म्हणून देण्यात आला.

घणसोली, आसूडगाव, तुर्भ्र डेपोतील असुविधा व समस्यांचे निवारण करताना परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्या व असुविधा यावरही प्रशासनदरबारी सातत्याने महाराष्ट्र कर्मचारी युनियनने लेखी निवेदनातून तसेच आयुक्त व परिवहन व्यवस्थापकांशी शिष्टमंडळासमवेत भेटून परिवहनच्या कर्मचाऱ्यांना न्याय दिला आहे.  कामगारांच्या आग्रहास्तव परिवहन उपक्रमाच्या तुर्भे डेपोच्या प्रवेशद्वारानजिक महाराष्ट्र कर्मचारी युनियनचा नामफलक उभारण्यात आला असून बुधवारी दुपारी १ वाजता कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या हस्ते नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे सचिव मंगेश गायकवाड़, युनिट अध्यक्ष नितिन गायकवाड, उपाध्यक्ष कांतिलाल चांदणे, प्रकाश भोईर, बसवराज पाथरवट, प्रवर्तक अशोक बिराजदार, जितेश तांडेल, मसूरे यांच्यासह मोठ्या संख्येने परिवहनचे अधिकारी व कर्मचारी तसेच युनियनचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

Previous Post

प्रभाग ३४ मध्ये कचरा संकलनासाठी डब्बे द्या, नंतरच वर्गिकरणाची सक्ती करा : सौ. सुजाता सुरज पाटील

Next Post

प्रभाग १९ मध्ये गणेशोत्सवापूर्वी ब्लिचिंग फवाडरची फवारणी करा : सुनिता हांडेपाटील

Next Post
कोरोना उपचाराबाबतची माहिती रूग्णांच्या नातेवाईकांना वेबपोर्टलच्या माध्यमातून ‘अपडेट’ स्वरूपात उपलब्ध करून द्या : सुनिता हांडेपाटील

प्रभाग १९ मध्ये गणेशोत्सवापूर्वी ब्लिचिंग फवाडरची फवारणी करा : सुनिता हांडेपाटील

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ९६ मधील समस्या तात्काळ सोडवा : गणेश भगत

नेरूळ सेक्टर २४ मधील उद्यानामध्ये स्वच्छता अभियान राबवा : गणेश भगत

तुर्भे बसडेपोच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन

तुर्भे बसडेपोच्या प्रवेशद्वारावर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com