• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 22, 2022

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार ७.५० लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणार ७.५० लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : ९८२००९६५७३ : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : नवे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ आता सुरु होत असून ,राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी व ज्यू या अल्पसंख्याक समाजातील व्यावसायीक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्जाची योजना सुरु आहे. या योजनेच्या लाभासाठी इच्छूक पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शेख यांनी केले आहे.

अल्पसंख्याक समाजातील दहावी आणि बारावीनंतरच्या व्यावसायीक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरींग, मेडीकल, नर्सिंग, फॅशन डिझायनींग, टुरीजम, पत्रकारीता, मास मिडीया, चित्रपट निर्मितीशी संबंधीत विविध व्यावसायीक अभ्यासक्रम, ॲनिमेशन, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहेत, असे डॉ. शेख यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेतून ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज मिळू शकते. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याचे वय १६ ते ३२ वर्ष असावे, तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा शहरी भागासाठी १ लाख २० हजार रुपयांपेक्षा कमी तर ग्रामीण भागासाठी ९८ हजार रुपयांपेक्षा कमी असावी. राज्य शासनामार्फत मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत असून यामधून ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्याचे वय १८ ते ३२ वर्ष असावे, तसेच कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत असावी, अशा अटी आहेत. दोन्ही शैक्षणिक कर्ज योजनांसाठी व्याजदर फक्त ३ टक्के इतका आहे. विद्यार्थ्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापासून पुढील ५ वर्षात कर्जाची परतफेड करायची आहे, असे डॉ. शेख यांनी सांगितले.

योजनेच्या लाभासाठी malms.maharashtra.gov.in या लिंकवर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हास्तरावरील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात संपर्क साधावा. महामंडळाच्या https://mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जिल्हास्तरीय कार्यालयांची तसेच योजनेची माहिती उपलब्ध असून या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्जही करता येईल. राज्यस्तरावर महामंडळाच्या ओल्ड कस्टम हाऊस, फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात संपर्क साधावा किंवा ०२२-२२६५७९८२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

प्रभाग ३४ मधील अंर्तगत व बाह्य रस्त्यांची डागडूजी करून खड्डे बुजवा : संदीप खांडगेपाटील

Next Post

तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रसारणास प्रोत्साहन नको : आरोग्य सेवा आयुक्तालय

Next Post
तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रसारणास प्रोत्साहन नको : आरोग्य सेवा आयुक्तालय

तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रसारणास प्रोत्साहन नको : आरोग्य सेवा आयुक्तालय

नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

मुख्यमंत्रीसाहेब, मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांचे उर्वरित दोन टप्प्यातील कोव्हड भत्ता द्या : संदीप खांडगेपाटील

सानपाडामधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई करा : पांडुरंग आमले

प्रभाग ३० मध्ये ब्लिचिंग पावडरची फवारणी करा : पांडुरंग आमले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com