• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 8, 2022

उरण तालुक्यात लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रिय

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
उरण तालुक्यात लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रिय
विठ्ठल ममताबादे : Navimumbailive.com@gmail.com
उरण दि 8सध्या शाळा सुरु झाल्याने सर्व शाळा तसेच शिकवणी (क्लासेस)समोर व शाळा, क्लासेसच्या आजू बाजूच्या परिसरात लहान मुले, बालके यांची खूप मोठी गर्दी दिसत असते. पालकांचीही गर्दी यावेळी दिसून येते.शाळेत किंवा शिकवणी (क्लासेस ) मध्ये कोण येतात,कोण जातात याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात.प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त आहेत. याचा फायदा मुलांना पळविणारी टोळीने घेतला आहे. आई वडील व्यस्त असल्याने त्याचा फायदा घेत काही अनोळखी व्यक्ती शाळेत किंवा शिकवणी (क्लासेस )मध्ये जाऊन मी मुलाला न्यायला आलो आहे असे सांगून त्यानंतर मुलाला जवळ घेऊन चॉकलेट, खाद्य पदार्थ देऊन, वेगवेगळे आमिष दाखवून पळवून नेतात. तुझ्या आई वडिलांनी मला तुला न्यायला पाठविले आहे असे सांगून सुद्धा मुलांना पळविण्याचे प्रकार उरण मध्ये सुरु आहेत. त्यामुळे पालकांना आता सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.लहान मुलांना चोरणारी टोळी नजर चुकवून किंवा आमिष दाखवून लहान मुलांना पळवत असल्याने उरण मध्ये लहान मुलांना पळविणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसते.
उरण तालुक्यात सध्या दोन घटना समोर आल्या आहेत.पहिली घटना अशी आहे.नवघर गावातील बस स्टॉप जवळ एक मुलगा शाळेत जाण्यासाठी गाडीची वाट पाहत उभा होता. अचानक एक महिला त्याच्यासमोर आली आणि त्याला चाकूचा धाक दाखवून घाबरविण्याचा प्रयत्न केला असता त्या मुलाने तेथून धाव ठोकून सरळ घर गाठला. आणि घडलेला सर्व प्रकार घरातील पालकांना सांगितला. दुसरी घटना अशी आहे की उरण जेएनपीटी समोरील कॉलनी मधील एका शिकवणी वर्गात एक अनोळखी इसम जाऊन एका मुलाला घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे असे सांगू लागला. लहान मुलाने त्याच्यासोबत जाण्यासाठी नकार दिल्यानंतर शिक्षिकेने लगेच घरी फोन केला. तेव्हा समजले की कोणत्याही माणसाला मुलाला आणायला पाठविले नाही.शिक्षिका फोनवर बोलत असताना त्या अनोळखी माणसाला संशय आला आणि तो तेथून पळून गेला. त्यामुळे सर्व पालकांना विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी विनंती केली आहे की सध्या सतर्क रहा. शाळेतून किंवा ट्युशन मधून मुलांना आणण्यासाठी उशीर होत असेल तर तसे वर्गातील शिक्षकांना फोन करून कळवा.शाळेत मुलाला सोडेपर्यंत व शाळा सुटल्यानंतर आपल्या मुलावर पालकांनी विशेष लक्ष द्यावे.अशी विनंती विविध सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी पालकांना केली आहे.
ReplyReply allForward
Previous Post

नेरूळ सेक्टर १० मधील वृंदावन सोसायटीसमोरील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची राष्ट्रवादीची मागणी

Next Post

मोदी सरकारचा नवा नारा ‘न खाने दूँगा और न पकाने दूँगा : नाना पटोले

Next Post
भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचाराचे केंद्र असलेला पक्ष : नाना पटोले

मोदी सरकारचा नवा नारा ‘न खाने दूँगा और न पकाने दूँगा : नाना पटोले

नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

मूषक नियत्रंण कर्मचाऱ्यांच्या कोव्हिड भत्त्यासाठी संदीप खांडगेपाटील यांचा पाठपुरावा कायम

नेरूळ-जुईनगर नोडमध्ये ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जनजागृती अभियान राबवा : संदीप खांडगेपाटील

नेरूळ सेक्टर ६,८,१० व सारसोळे तसेच कुकशेतमधील पदपथावर ब्लिचिंग पावडर फवारणी करा : संदीप खांडगेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com