• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 19, 2022

‘जागर २०२२’ चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण

adminbyadmin
in टॉप न्यूज, नवी मुंबई
0
‘जागर २०२२’ चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण

संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील

नवी मुंबई :   नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त ‘जागर २०२२’ उपक्रमांतर्गत मान्यवर वक्त्यांच्या विविध विषयांवरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जयंतीचे औचित्य साधून चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

दोन गटांमध्ये घेण्यात आलेल्या या चित्रकला स्पर्धेत आठवी ते बारावीच्या गटात सहभागी ३१७ विद्यार्थ्यांमधून जुईनगर येथील रितेश महेंद्र गुप्ता या विद्यार्थी चित्रकाराने तसेच खुल्या गटात सहभागी ३४ चित्रकारांमधून सानपाडा येथील श्री. कुणाल इतवेकर या चित्रकाराने प्रथम क्रमांक पटकाविला. महापालिका आयुक्त भिजीत बांगर यांच्या शुभहस्ते विजेत्या चित्रकारांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

या चित्रकला स्पर्धेकरिता आठवी ते बारावीच्या गटासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रेरक विचारांवर आधारित चित्र, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रातील प्रसंग, बाबासाहेब आणि पुस्तक हे तीन विषय देण्यात आले होते. यामध्ये विविध शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील ३५१ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत आपल्या कल्पनेतील बाबासाहेबांच्या विचारांना तसेच प्रतिमांना चित्ररूपात रेखाटले. यामध्ये रितेश गुप्ता (जुईनगर), श्रेया वायंगणकर (कोपरखैरणे), प्रथमेश रिचवाड (रबाळे) हे अनुक्रमे ३ क्रमांकाचे तसेच तनेश सूळ (घणसोली), सानिका दुदुस्कर ( नेरुळ), खुशबू यादव ( रबाळे ) हे उत्तेजनार्थ पारितोषिकांचे मानकरी ठरले.

खुल्या गटासाठी देण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रेरक विचारांवर आधारित चित्र, बाबासाहेब आणि पुस्तक तसेच बाबासाहेब – ज्ञान हीच शक्ती या तीन विषयांवर ३७ चित्रकारांनी आपल्या मनातील संकल्पना चितारल्या. त्यामध्ये कुणाल इतवेकर( सानपाडा), आकाश पोतदार( नेरूळ), साहील पाटील( ऐरोली) यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक तसेच नरेश लोहार (बेलापूर) यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले.

दोन्ही गटांतील पहिल्या ३ क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे १० हजार, ७,५००/- व ५ हजार रक्कमेची तसेच उत्तेजनार्थ विजेत्यांना २ हजार रक्कमेची पारितोषिके वितरित करण्यात आली.

स्पर्धा परीक्षक अरविंद कांबळे, किर्तीराज राबणे, अमोल सत्रे यांचा तसेच स्पर्धा संयोजक अमोल खरात यांचा याप्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला.

स्पर्धेमधील विजेत्या तसेच निवडक चित्रांचे प्रदर्शन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये पहिल्या मजल्यावरील पोडीयम गार्डन पॅसेजमध्ये आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनाचे उद्‌घाटन संपन्न झाले. पालकमंत्री महोदयांनी चित्रांच्या माध्यमातून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करणाऱ्या या नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धा उपक्रमाचे कौतुक केले तसेच ठाणे लोकसभा सदस्य खासदार श्री राजन विचारे यांच्यासह चित्रांचे अवलोकन करून पसंतीची दाद दिली. बाबासाहेबांच्या जयंतीदिनी स्मारकाला भेट देणाऱ्या हजारो नागरिकांनी चित्रप्रदर्शनाला भेट देत चित्रकारांच्या कलेची प्रशंसा केली.

 

००००००००००००००० ००००००००००००००००० ०००००००००००००००००००

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई लाईव्हचे कार्यालय : शॉप क्रं २, गोदावरी सोसायटी, भुखंड क्रमांक ३०७-३०८, सेक्टर सहा, नेरूळ (पश्चिम), नवी मुंबई

Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर उत्साहात

Next Post

मशिदीवरील अनधिकृत भोंग्यावर त्वरित कारवाई करा:  मनसेचे पोलीस आयुक्तांना निवेदन

Next Post

मशिदीवरील अनधिकृत भोंग्यावर त्वरित कारवाई करा:  मनसेचे पोलीस आयुक्तांना निवेदन

कंत्राटी कर्मचाऱ्यांना २८ ऑक्टोबरपर्यंत बोनस व ऑक्टोबरचे वेतन अदा करण्याचे आयुक्तांचे निर्देश

३० वर्षापेक्षा जास्त काळ झालेल्या इमारतींचे संरचनात्मक परिक्षण करणेबाबत जाहीर आवाहन

नेरूळ सेक्टर सहामधील सीव्ह्यू उद्यान स्थानिक रहीवाशांसाठी खुले करा : संदीप खांडगेपाटील

आयुक्तसाहेब, मुषक नियत्रंकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करा : संदीप खांडगेपाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com